क्राईम न्यूज

Vasai Virar Gangster : गॅंगस्टरच्या मुसक्या आवळल्या! – विरारमधील बिल्डर हत्याकांडाचा ‘डॉन’ सुभाषसिंग ठाकूर अखेर उत्तर प्रदेशातून अटकेत

Vasai Virar Gangster Arrested : जेजे हत्याकांडातील जन्मठेपेचा कैदी उपचाराच्या नावाखाली होता ‘फरार’; MBVV गुन्हे शाखेची मोठी कारवाई; वसई-विरारमधील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

वसई/विरार :- विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान यांच्या गोळीबार करून केलेल्या हत्या प्रकरणाला मीरा भाईंदर वसई विरार (MBVV) पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने एक मोठे आणि निर्णायक वळण दिले आहे. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन सुभाषसिंग ठाकूर याला अखेर उत्तर प्रदेशातील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले आहे. Vasai Virar Latest Crime News

26 फेब्रुवारी 2022 रोजी विरारच्या मनवेलपाडा येथे समय चौहान यांची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना मोक्का लावून अटक करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्याचा ‘मास्टरमाईंड’ असलेला सुभाषसिंग ठाकूर हा 1992 च्या गाजलेल्या जेजे हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

रुग्णालयातील ‘आश्रय’ संपला

विशेष म्हणजे, 2019 पासून हा गॅंगस्टर उपचाराच्या नावाखाली बनारस हिंदू विद्यापीठाच्या (BHU) रुग्णालयात वास्तव्यास होता, ज्यामुळे त्याला चौहान हत्या प्रकरणात अटक करता येत नव्हती. 2024 मध्ये त्याची पुन्हा कारागृहात रवानगी होताच, गुन्हे शाखेने त्याला वसईत आणण्यासाठी तातडीने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

सोमवारी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आणि त्यांनी फतेहगढ कारागृहातून सुभाषसिंग ठाकूर याचा ताबा घेतला. पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुख्यात गॅंगस्टरला आज (मंगळवारी) वसईत आणले जाणार आहे.

गुन्हेगारी कारवायांचा पर्दाफाश होणार

वसई-विरार शहरातील अनेक गुन्हेगारांना सुभाषसिंग ठाकूरचा आश्रय मिळतो आणि त्याच्याच सांगण्यावरून अनेक गंभीर गुन्हेगारी कारवाया चालतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे, ठाकूर पोलिसांच्या ताब्यात आल्यामुळे वसई-विरार परिसरातील अनेक गंभीर आणि प्रलंबित गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago