Vasai Virar Latest River Accident : आईसोबत पोहायला गेलेल्या ध्रुवचा श्वास अडकला; पूलवरील रक्षकाने बाहेर काढले, मात्र रुग्णालयात मृत घोषित
विरार :- वसई-विरार शहरातील जलतरण तलावांची सुरक्षितता पुन्हा एकदा गंभीर चर्चेत आली आहे. विरार (पश्चिम) येथील यशवंत नगर भागातील अमेय क्लासिक क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये मंगळवारी सायंकाळी एका साडेतीन वर्षांच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. Virar Latest Accident News
ध्रुव बिष्ट असे या मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरारमध्ये राहणारा ध्रुव बिष्ट आपल्या आईसोबत मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अमेय क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये गेला होता. पोहत असताना अचानक त्याच्या तोंडात आणि नाकात पाणी गेले, ज्यामुळे त्याचा श्वास अडकला आणि तो बुडू लागला.
तात्काळ पूलवरील रक्षकाने (गार्ड) त्याला बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर ध्रुवला उलट्या होऊ लागल्या. त्याला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच बोळिंज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी बोळिंज पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करून तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर शहरातील स्विमिंग पूल्समध्ये असलेल्या सुरक्षा उपाययोजनांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…