मुंबईठाणे
Trending

Vasai Traffic Police : रस्ता सुरक्षा अभियान: वसई वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती; 650 विद्यार्थ्यांचा ‘सुरक्षित प्रवासा’चा संकल्प

Vasai Traffic Police Latest News : अपघातावेळी मदतीचे तंत्र आणि वाहतूक नियमांचे धडे; ‘राधे फाउंडेशन’सह पोलिसांचे विशेष मार्गदर्शन

वसई | वाढते रस्ता अपघात रोखण्यासाठी आणि तरुणांमध्ये वाहतूक शिस्त रुजवण्यासाठी वसई वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विशेष रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबवण्यात आले. ‘रस्ता सुरक्षा महिना जानेवारी 2026’ च्या निमित्ताने आयोजित या सत्रात सुमारे 650 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली.

अपघातातील ‘गोल्डन अवर’चे महत्त्व

कार्यक्रमात राधे फाउंडेशनच्या प्रमुख डॉ. रिता सावला यांनी आपत्कालीन परिस्थितीत जखमींना कशी मदत करावी, याचे प्रात्यक्षिक दिले. रस्ता अपघात झाल्यास 108 आणि 122 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून कोणती माहिती द्यावी, तसेच जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण कसे वाचवावे, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

हेल्मेट आणि सीट बेल्ट केवळ नियम नव्हे, सुरक्षा कवच!

पोलीस उपनिरीक्षक मेहबूब तडवी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “वेगाची मर्यादा पाळणे आणि सुरक्षेच्या साधनांचा वापर करणे हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आहे.” त्यांनी हेल्मेट, सीट बेल्टचा वापर, मद्यपान करून वाहन चालवण्याचे धोके आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे होणारी कायदेशीर कारवाई यावर सविस्तर प्रकाश टाकला.

मान्यवरांची उपस्थिती

एंझा डायस (ह्युमॅनिटी अँड सायन्स विभाग) यांच्या प्रस्तावनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एन. के. कव्हाले, अनुराग राठोड, एस. व्ही. गोसावी, के. ए. मोकाशी, तसेच पोलीस शिपाई भीमराज घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0