Vasai Tadipar News : नायजेरियन व्यक्तीला भारतातून हद्दपार करत मायदेशी परत परतावले मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कामगिरी

Vasai Police Black Listed Nigerian Deported : ब्लॅकलिस्ट नागरिकाला डिपोर्ट (Deport) केले आहे.George Babajide Olutomi असे व्यक्तीचे नाव आहे
मिरा रोड :- देशात मुदत संपल्यानंतर वास्तव्य करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला मिरा भाईंदर वसई विरार पोलीस Mira Bhayandar Police आयुक्तालयाच्या विशेष पथकाने George Babajide Olutomi या नायजेरियन व्यक्तीला ब्लॅकलिस्टड करून त्याला त्याच्या मायदेशी परत पाठवले आहे. Vasai Police Black Listed Nigerian Deported पोलिसांनी आरोपीला Deport केले आहे. एकीकडे अमेरिकेने अनेक वर्ष अवैध राहणाऱ्या भारतीयांना मागील आठवड्यात परत पाठवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एफ.आर.आर.ओ. मुंबई यांनी 2012 मध्ये अवैध वास्तव्य व फसवुण केल्यामुळे नायजेरियन नागरीक George Babajide Olutomi, यास हददपार करून भारतामध्ये पुन्हा येण्यास परावृत्त करणेकरीता Blacklist केलेले होते. तरीसुध्दा George Babajide Olutomi हे पासपोर्ट वर असलेले नावांत बदल करुन बिजनेस व्हिसावर पुन्हा भारतात आले होते. भारतात आल्यानंतर त्यांचेविरुध्द आझाद मैदान मुंबई येथे एनडीपीस कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. नायजेरियन नागरीक पुन्हा भारतात आलेले आहेत व त्यांना Deport करण्याबाबत एफआरआरओ मुंबई यांनी आदेशीत केल्यावर नायजेरियन नागरीकाचा शोध घेवुन त्यांचेविरुध्द Deportation ची कारवाई सुरु करण्यात आलेली होती. त्यादरम्यान त्यांचेविरुध्द इतर काही जिल्हयांत गुन्हे दाखल आहेत. याबाबात खात्री करुन George Babajide Olutomi यास छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथुन 28 फेब्रुवारी 2025 रोजी हवाईमार्गाने Lagos Nigeria येथे जातीने हजर राहून हददपार करण्यात आलेले आहे. व त्यांना भारतात येण्यापासुन परावृत्त करणेकरीता Blacklist करण्यात आलेले आहे.
ही कारवाई सुहास बावचे, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) तथा एफ.आर.ओ. मि.भा.व.वि. वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष शाखा, शितल शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक व मंजुशा राजन गुप्ता, महिला पोलीस हवालदार विशेष शाखा यांनी कामगिरी यशस्वी रित्या पार पाडली आहे.