Vasai Scam News : FedEx कुरिअरनं वाढत आहे फसवणूक, वसईत 3.50 लाख रुपयांचा गंडा

Vasai Cyber Police Latest News : सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसवणुकीतील पैसे परत मिळवून देण्यास यश
वसई :- अलिकडच्या काळात अशा गोष्टी सुरक्षा यंत्रणांच्या नजरेस आल्या आहेत की, मोठ्या प्रमाणात डेटा चोरला गेला आहे.त्याचे परिणाम गंभीर आणि दूरगामी आहेत. ज्यामुळे लाखो लोकांची आर्थिक फसवणूक होण्याचा धोका आहे. असाच प्रकार वसई परिसरात राहणाऱ्या हारुण मेमन, (वय 45) यांना अनोळखी व्यक्तीने फोन करुन Fedex Courier मथुन बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदार यांचे नावाचे कुरीवर आले असुन त्याचर अपूर्ण पता असल्याने योग्य पत्यासह 5 रु चे ट्रान्होंक्शन करण्यास तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार यांनी कुरीअरबाबत पडताळणी न करता संशयीत इसमाने सांगितल्याप्रमाणे कारवाई केली असता त्यांचे बैंक खात्यातून सुमारे 4 लाख रूपये रक्कम कपात झाल्याबाबतचा मैसेज त्यांचे मोबाईलवर प्राप्त झाला. त्यावर तक्रारदार यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. Vasai Cyber Crime News
तक्रारदार यांनी सायबर पोलीस ठाणे येथे फसवणुकी बाबत अर्ज दाखल केला त्यानंतर NCCRP Portal वर त्यांची तात्काळ नोंद घेण्यात आली.तक्रारदार यांची ऑनलाईन NCCRP Portal वर तक्रार नोंदविल्याने फसवणुकीची वर्ग झालेली रक्कम संशयीत बैंक खात्यात गोठविण्यात आली. तक्रारदार याची बैंक खात्यांमध्ये आलेली रक्कम परत मिळविण्याकरीता न्यायालयमध्ये अर्ज सादर करण्याबाबत तक्रारदार यांना सूचना देण्यात आल्या, तक्रारदार यांनी त्यांची फसवणूची रक्कम परत मिळविण्याकरीता न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून फसवणुकीतील चार लाखांपैकी तीन लाख 50 हजार 599 रुपये मुळ खात्यात परत आणून देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे फसवणूक झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

हि कारवाई अविनाश अंबरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार विलास खाटीक, पोलीस अंमलदार राहुल बन, महिला पोलीस हवालदार माधुरी धिडे यांनी पार पाडली आहे.



