क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Vasai Robbery News : मालकाने पगार थकवला म्हणून चालकानेच लंपास केली 15 लाखांची बस; वालीव पोलिसांकडून विरारच्या चालकाला बेड्या

Vasai Latest Robbery News : 15 लाखांची बस चोरीला गेल्याने ट्रॅव्हल्स मालकाची उडाली होती झोप; पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला छडा

वसई/वालीव | ‘काम केले पण दाम मिळाले नाही’ या रागातून एका चालकाने आपल्याच मालकाची तब्बल 15 लाख रुपये किमतीची ट्रॅव्हल्स बस चोरल्याची धक्कादायक घटना वसईत उघडकीस आली आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्याने तपास करत या गुन्ह्याचा उलगडा केला असून, आरोपी चालकाला अटक करून चोरीला गेलेली बस जप्त केली आहे. Vasai Valiav Police Latest News

काय आहे प्रकरण?

उषा शरद हरिदास यांचा ‘पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ नावाचा बसेस भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय आहे. 23 डिसेंबर 2025 रोजी त्यांची सहा चाकी बस (क्र. MH-43-H-4062) वालीव फाटा येथे पार्क केलेली होती. मात्र, काही वेळातच ही बस तिथून गायब झाली. अज्ञात चोरट्याने बस पळवल्याची तक्रार वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

वसई-विरार परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी हे गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना फिर्यादीकडे पूर्वी चालक म्हणून काम करणाऱ्या कुणाल किशोर गायकवाड (वय 27, रा. विरार पूर्व) याच्यावर संशय आला.

पगाराच्या रागातून कृत्याची कबुली

पोलिसांनी कुणालला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या कुणालने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, “मालकाकडे माझा एका महिन्याचा पगार बाकी होता. वारंवार मागणी करूनही पगार मिळत नसल्याने मी रागाच्या भरात बस चोरली.” आरोपीच्या माहितीवरून पोलिसांनी 15 लाख रुपये किंमतीची बस आणि चावी जप्त केली आहे.

या पथकाने केली कामगिरी

पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ जैद, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर, शैलेश पाटील, किरण म्हात्रे आणि पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0