Vasai Police Latest News
Vasai Police Latest Crime News : सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे यश; तक्रारदार महिलेकडून पोलिसांचे आभार
वसई | वसईतील सादोडावाडी परिसरात राहणाऱ्या लिनेट ॲशली अल्मेडा या महिलेचे 35 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गहाळ झाल्याची धक्कादायक घटना 2 जानेवारी 2026 रोजी घडली होती. मात्र, वसई पोलीस ठाण्याच्या Vasai Police Crime Branch गुन्हे प्रकटीकरण शाखेने तत्परता दाखवत केवळ 2 तासांत या दागिन्यांचा छडा लावून ते महिलेला परत मिळवून दिले.
नेमकी घटना काय?
लिनेट अल्मेडा यांनी होळी येथील बेसिन कॅथलिक बँकेच्या लॉकरमधून कंगण, चैन, हार, सोन्याची बिस्किटे आणि कर्णफुले असे एकूण 260 ग्रॅम सोने काढले होते. हे दागिने त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवल्याचे त्यांना वाटले. मात्र, बाजारात खरेदी करून घरी पोहोचल्यानंतर डिक्की तपासली असता दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी रात्री 8 वाजता वसई पोलीस ठाणे गाठले.
तपासाचा ‘वसई पॅटर्न’
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगांवकर यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी बँकेसमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक आश्चर्यकारक बाब समोर आली. तक्रारदार महिलेने दागिने स्वतःच्या दुचाकीत न ठेवता, नजरचुकीने शेजारीच उभ्या असलेल्या त्याच रंगाच्या दुसऱ्या मोपेडच्या डिक्कीत ठेवले होते.
दोन तासांत शोध आणि दागिने हस्तगत
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र भामरे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासावरून पोलिसांनी त्या दुसऱ्या दुचाकीचा क्रमांक (MH 48 BS 5839) शोधून काढला. ही दुचाकी सुनिता फ्रेडी मोन्साल्वीस यांची असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस तातडीने सुनिता यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या डिक्कीत असलेले सर्व दागिने सुखरूप ताब्यात घेतले. दागिने गहाळ झाल्याची माहिती मिळाल्यापासून अवघ्या 2 तासांच्या आत पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केली.
पोलीस पथकाचा गौरव
ही यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात महेंद्र भामरे, प्रशांत पाटील, सूर्यकांत मुंढे, दिनेश पाटील, प्रशांत आहेर आणि इतर अंमलदारांचा समावेश होता. गहाळ झालेले आयुष्यभराची कमाई परत मिळाल्याने लिनेट अल्मेडा यांनी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मनापासून आभार मानले आहेत.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…