मुंबईठाणे
Trending

Vasai Police News : (डीपीडीसी) जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या अंतर्गत पोलीस ठाण्याला 100 कंप्यूटर आणि प्रिंटर चे वाटप

Vasai Police Latest News : पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या शुभहस्ते कम्प्युटर्स आणि प्रिन्टर्स वाटप

मिरा रोड :– राज्य सरकारच्या 100 दिवस कृती आराखड्याच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत विकास कामे अतिशय जोरदार केली जात आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय Vasai Virar CP Madhukar Pandey यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात Vasai Police Station 100 कप्यूटर आणि प्रिंटर्स उपलब्ध करून दिले आहे. Vasai Virar Police Latest News

मधुकर पाण्डेय (भा.पो.से.), पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि., यांचे शुभहस्ते जिल्हा नियोयन समिती, ठाणे (डीपीडीसी) यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधीतुन मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत पोलीस ठाणे अधुनिकीकरणा करिता 100 कॉम्प्यूटर व प्रिन्टर्स वाटप करण्यात आले.यावेळी मधुकर पाण्डेय (भा.पो.से.), पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि., यांनी सर्व पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांना आधुनिक, व्यावसायीक व लोकाभिमुख पोलीसिंग करणेबाबत आवाहन केले.

तसेच त्यांनी प्रतिनिधिक स्वरुपात वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, विशेष शाखा, महेश तोगडवार, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, काशिगाव पोलीस ठाणे, मेघना बुराडे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, मिरारोड पोलीस ठाणे, सतिश बुराळे, राखीवच पोलीस उप निरिक्षक यांना कॉम्प्यूटर व प्रिन्टर्स वाटप केले.

सदर कार्याक्रमात मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त मुख्यालय, सोहेल शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त, मुख्यालय व पोलीस ठाणेचे अधिकारी, अंमलदार यांच्या उपस्थित संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0