Vasai Police Arrested Illegal Bangladeshi Migrants : वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मच्छी मार्केट परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने अटक केली आहे
वसई :- बेकायदेशीररित्या राहणाऱ्या दोन बांगलादेशींना वसईतील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांकडून बेड्या ठोकल्या आहे. Vasai Police Arrested 2 Bangladeshi Migrants मासुम अबुल मंडल, (वय 29), हबीबुर रहमान शेख, (वय 45) अशी आरोपींची नावे असून दोघेही मजुरीचे काम करतात.
पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांनी वसई भागात बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. नायगाव कोळीवाडा मच्छीमार्केट व लोहपाडा, रानगाव, वसई येथून दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. चौकशी अंती ते बांगलादेशी असल्याचे स्पष्ट होताच त्यांना ताब्यात घेत पुढील तपासासाठी वसई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यानुसार, पोलिसांनी दोघांना अटक करत अधिक तपास करत आहे.बेकायदेशीररित्या भारतात येत ओळख लपवून वसई परिसरात राहत होते.
पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार रोशन किणी, पोलीस हवालदार महेंद्र शेटये, अमित चव्हाण,सुनिल पागी, महिला पोलीस हवालदार सुप्रिया तिवले सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी उत्कुष्ठरित्या केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…