क्राईम न्यूजमुंबई
Trending

वसई : बेपत्ता पेट्रोलपंप मालकाची हत्या, हत्या करणारे फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Virar Crime News : पेट्रोल पंप मालकाची हत्या करणारा ड्रायव्हर नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी केले अटक

विरार :- विरारच्या चंदनसार Virar Chandansar येथील पेट्रोलपंपाचे मालक रामचंद्र खाकराणी (75 वर्ष) यांचा मृतदेह 25 ऑगस्ट दरम्यान मुंबई-अहमदाबाद महामार्गावर त्यांच्याच गाडीत आढळून आला आहे. Virar Petrol Pump Owner Murder त्याच्या आदल्या रात्रीपासून ते बेपत्ता होते. त्यांच्या ड्रायव्हरने ही हत्या केली असल्याची शक्यता होती. नायगाव पोलीस फरार ड्रायव्हरचा शोध घेत होते. पोलिसांनी नायगाव पोलीस ठाण्यात Naygaon Police Station घडलेल्या घटनेबाबत भारतीय न्याय सहायता कलम 140(2),103(1),309(2),238 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. परंतु पोलिसांनी त्यांचा ड्रायव्हर मुकेश खूप चंदाने व त्याच्या साथीदाराने त्यांना लुटण्याच्या आणि अपहरण करून गळा आवळून खून केल्याचे पोलिसांना संशय होता. तसेच घटनेच्या वेळी रोख रक्कम, हिऱ्याची अंगठी, आणि माकडे घड्याळ चोरी करून पळून गेल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांना जबरी चोरीच्या उद्देशानेही हत्या झाल्याचे प्राथमिक संशय होता. Virar Latest Crime News

पोलीस आयुक्त आणि अप्पर पोलीस आयुक्त यांनी नायगाव पोलिसांना गुन्ह्याचे उकल‌ करून आरोपींना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखा कक्ष दोन वसई पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख यांच्या युनिटने वेगवेगळे पथके तयार करून पेट्रोल पंप मालकाच्या अपहरण झाले त्या दिवशी मोबाईलच्या लोकेशन आणि मोबाईल रेकॉर्ड या संदर्भातील माहिती संग्रहित करून तसेच घटनास्थळी मृतदेहाच्या आजूबाजूला असलेल्या संशयित वस्तूंची पाहणी करून आणि त्याचे बारीक निरीक्षण करून आणि तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी हा कोण ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार यांनी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. Virar Latest Crime News

गुन्हयातील वाहन चालक आरोपीचे साथीदार हे भारत-नेपाल देशांचे सिमावती भागातील रहीवासी असुन ते गुन्हा करुन त्यांचे मूळगावी पळून जाण्याची शक्यता असल्याने मुंबईतून उत्तरप्रदेश राज्यात जाणा-या मेल गाड्यांचे,रेल्वे स्टेशन परीसरात तसेच उत्तरप्रदेश राज्यात जाणा-या लग्झरी बसेस स्थानकांचे ठिकाणी वेगवेगळी पथके नेमून शोध घेण्यात आला. अपहृत व्यक्तीचा मृतदेह मिळालेल्या ठिकाणांचे आजूबाजूस असलेल्या सी सी टी व्ही कॅमेरांचे फुटेजचे परीक्षण करीत असताना आरोपी हे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन पायी चालत कृष्णा उडपी हॉटेल,वसई फाटा येथे गेले व तेथून रिक्षात बसून विरार फाटा येथे उतरले. विरार फाटा येथून गुजरात दिशेने जाणारे खाजगी लम्हारी बसमध्ये बसून अपोलो हॉटेल, तलासरी या ठिकाणी उतरुन तेथून गुजरात बाजूकडे जात असल्याचे फुटेज प्राप्त झाले. आरोपी हे उत्तरप्रदेश राज्यातुन नेपाळ देशाची सिमा ओलांडून जाण्याची शक्यता असल्याने त्याअनुषंगाने तात्काळ वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देवून त्यांचे मागदर्शनानुसार गुन्हे शाखा, कक्ष 2, वसईचे प्रभारी पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांनी त्यांचेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, अमोल कोरे, पोलीस नाईक प्रशांतकुमार ठाकुर व मध्यवती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी त्यांचेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेंद्रे, पोलीस हवालदार राजवीर संधू व साकेत माघाडे असे संयुक्त पथक तयार करून त्यांना सुचना देवून तात्काळ रिस्द्धार्थनगर, उत्तरप्रदेश या ठिकाणी रवाना केले.पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने सिद्धार्थनगर परिसरात आरोपीचा शोध घेतला असता आरोपी है लूंचीनी, नेपाळ या ठिकाणी पळून गेले असल्याबाबत माहिती प्राप्त झाली, त्याअनुषंगाने गोपनीय बातमीदार तयार करून अतीशय गोपनियरित्या काम करून माहिती घेतली असता मयताची सोन्याची अंगठी आणि घड्याळ हे नेपाल देशात विक्री करीता गेले परंतु त्या महागड्या चोरीच्या वस्तूंना कोणी खरेदीदार न मिळाल्याने आरोपी हे महादेव पूरम कॉलनी, गोरखपूर या ठिकाणी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार ठिकाणी सापळा लावून अतीशय शिताफीने दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गुप्त बातमीदार तयार करुन त्यांना गुन्हयातील मयताचे ताब्यातून चोरुन नेलेल्या 15 लाख 15 रुपये किंमतीच्या सोन्याची अंगठी, घड्याळ व रोख रक्कमेसह अटक करण्यात आले आहे.

अटक आरोपींची नावे

1.मुकेश गोवर्धनदास खूबचंदानी,( रा. उल्हासनगर-3)

2.अनिल राजकुमार उर्फ नेपाली मल्लाह उर्फ सहानी उर्फ थापा, सध्या रा. बोरीवली, मुळ रा.ता-पकडी, जि-कपिलवस्तु, देश-नेपाळ,)

आरोपी मुकेश गोवर्धनदास खूबचंदानी याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असुन त्याच्या विरोधात सहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पोलीस पथक

मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा-2 वसई युनीटचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक/शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर प्रकाश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते, पोलीस फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रविंद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरहे, अमोल कोरे, प्रशांतकुमार ठाकुर, अजित मैड, प्रतिक गोड, राजकुमार गायकवाड, रामेश्वर केकान, शुभम गायकवाड तसेच मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पो. निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेन्द्रे दत्तात्रय सरक, पोलीस उपनिरीक्षक, हितेन्द्र विचारे, स‌हाय्यक फौजदार आसीफ मुल्ला, श्रीमंत जेथे, मनोहर तायरे, अनिल नांगरे, हनुमंत सूर्यवंशी, संग्राम गायकवाड, राजविर संयु, प्रविणराज पवार, सतिष जगताप, राजाराम काळे, महेश वेल्हे, शिवाजी पाटील, गोचिद केंद्रे, संतोष मदने, पोशि, अंकीत सुतार, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुले, मसूब सचीन चौधरी आणि सायबर शाखेचे संतोष चव्हाण तसेच स्पेशल टास्क फोर्स उत्तरप्रदेश येथील १) DSP धर्मेशकुमार शाही निरीक्षक सत्यप्रकाश सिंह उप निरीक्षक/ यशवंत सिंह HC/ उमेशकुमार सिंह HC/अशोककुमार सिंह HC/मोहीतकुमार गौंड यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.Virar Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0