Vasai Police Latest News : ‘चॉकलेट’चे आमिष दाखवून पाशवी कृत्य; मीरा भाईंदर, वसई विरार पोलिसांकडून 2007 मधील ‘अनट्रेस्ड’ गुन्ह्याचा यशस्वी तपास
वसई :- मुंबईजवळील वसई परिसरात 2007 साली संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या एका 5 वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरण, बलात्कार (Rape) आणि निघृण खुनाच्या प्रकरणातील फरार आरोपीला तब्बल 18 वर्षांनंतर मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष-2, वसईने अटक केली आहे. Vasai Latest Crime News
माणिकपूर पोलीस Manikpur Police Station स्टेशनमध्ये नोंद झालेल्या या गुन्ह्यातील आरोपी नंदलाल उर्फ नंदु रामदास विश्वकर्मा हा गुन्हा केल्यानंतर तातडीने फरार झाला होता. 2007 साली नंदलालने पीडितेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर पाशवी कृत्य करत मारहाण केली आणि गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली होती.
मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष-2, वसईने या जुन्या गुन्ह्याचा नव्याने समांतर तपास सुरू केला.तपासादरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांची चौकशी केली आणि गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने आरोपीचे उत्तर प्रदेशातील मूळ गाव (सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील खरदौरी) शोधले.
तपास पथकाने तातडीने उत्तर प्रदेशात धाव घेतली आणि आरोपी नंदलाल विश्वकर्मा याला 10 डिसेंबर 2025 रोजी अटक करून 18 वर्षांपूर्वीच्या या पाशवी कृत्याचा हिशेब चुकता केला.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…