क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Vasai International Drug Racket : वसईमध्ये आंतरराष्ट्रीय हेरॉईन रॅकेट उघड! पाकिस्तानातून अमली पदार्थ मागवणाऱ्या मुख्य तस्कराला राजस्थानमधून अटक

Vasai Latest International Drug Racket Busted : 2 किलो हेरॉईनसह 8 कोटी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांच्या अटकेनंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई.

विरार-वसई :- मीरा-भाईंदर, वसई-विरार Vasai Police News पोलीसआयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (कक्ष-3) अत्यंत मोठी कामगिरी करत, आंतरराष्ट्रीय हेरॉईन तस्करीचे एक मोठे रॅकेट उघड केले आहे. Vasai Drug Racket या प्रकरणात 8 कोटी 10 लाख रुपये किमतीच्या हेरॉईनसह एकूण तीन आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीला पोलिसांनी राजस्थानमधून जेरबंद केले आहे. Vasai Police News

गुन्हे शाखा कक्ष-2 Vasai Crime Branch Unit 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांना 11 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्व येथील फादरवाडी येथे सापळा रचून समुंदरसिंग देवडा, युवराजसिंग राठोड आणि तकतसिंग राजपुत (सर्व राजस्थानचे रहिवासी) या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 2 किलो 11 ग्रॅम वजनाचा, 8 कोटी 4 लाख 40 हजार रुपये किमतीचा हेरॉईन नावाचा अमली पदार्थ, तसेच 5 लाख 65 हजार रुपये किमतीची स्विफ्ट कार आणि मोबाईल असा एकूण 8 कोटी 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. या तिघांविरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. Vasai Police News

तपासानंतर मुख्य आरोपी गजाआड

या तिन्ही आरोपींकडे केलेल्या कसून चौकशीतून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार हरिसिंग तेजसिंग रावलोती भाटी (वय 55) याचे नाव समोर आले. कौशल्यपूर्ण तपास आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने, गुन्हे प्रकटीकरण पथकाने 25 सप्टेंबर 2025 रोजी हरिसिंग भाटी याला त्याच्या मूळ गावी राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील मण्डार येथून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, हरिसिंग भाटी यानेच अटक आरोपींना हेरॉईन पुरवल्याची कबुली दिली. तसेच, तपासात अत्यंत धक्कादायक बाब उघडकीस आली आहे की, हस्तगत करण्यात आलेला 2 किलो हेरॉईन हा अंमली पदार्थ त्याने थेट पाकिस्तान या देशातून मागवला असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हरिसिंग हा मुळतः भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या जैसलमेर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

या कामगिरीमुळे अमली पदार्थ तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे, डीसीपी (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विरार गुन्हे शाखा कक्ष-3 ने ही उत्कृष्ट कारवाई पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0