Vasai Illegal Migrant : वसईमधून अवैध वास्तव्य करणार्या दोन बांगलादेशींना अटक

Vasai Illegal Bangladeshi Migrant Arrested By Vasai Police : अनैतिक मानवी विभागाची कारवाई ; अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशीय नागरिकांना वसईतून अटक
वसई :- शहरात अवैध वास्तव्य करणार्या दोन बांगलादेशी नागरिकांना Vasai Illegal Bangladeshi Migrant अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी Vasai Police कारवाई करत वसई कोळीवाडा गौसिया मस्जिद येथुन अटक केली आहे.अमीनुर सैदुल मेस्त्री (26 वर्ष रा. कोळीवाडा,वसई मुळ रा.बांग्लादेशी ), सलीम अक्रम शेख (48 वर्ष रा.कोळीवाडा वसई मुळ देश बांग्लादेशी) असे अटक करण्यात आलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांचे नाव आहे. Vasai Crime Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन बांगलादेशी नागरिक वसई कोळीवाडा गौसिया मस्जिद येथे राहत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या संशयित व्यक्तींना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडे नाव पत्ता आणि भारतीय नागरिकत्वाचे कागदपत्र विचारले असता त्यांच्यावर कोणतेही कागदपत्र तसेच व्हिजा नसल्याचे त्यांनी पोलिसांकडून कबुली जवाब मध्ये सांगितले आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात अवैधरित्या भारतामध्ये वास्तव्य आणि घुसखोरी प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात Vasai Police Station भारतीय पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3(अ),6(अ),सह विदेशी अधिनियमन 1946 चे कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. Vasai Crime Latest News

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार पोलीस हवालदार शिंदे, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार पागी, सर्व नेम.अन.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा विभाग तसेच सहाय्यक फौजदार पाटनकर पोलीस शिपाई गर्जे नेम वसई पोलीस ठाणे यांचेसह उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे. Vasai Crime Latest News