Vasai Fraud News : शादी डॉट कॉमवरून महिलांशी ओळख करून फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुजरात मधून अटक

Vasai Shadi Dot Com Fraud News : दिल्ली क्राइम ब्रांच सायबर सेक्युरिटी चा अधिकारी असल्याचे ओळख सांगून फसवणूक करायचा, आत्तापर्यंत दहा ते बारा महिलांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वसई :- शादी डॉट कॉम या सोशल मीडियाच्या साईटवरून महिलांशी ओळख करून जवळीक साधत फसवणूक करणाऱ्या आरोपीला वालीव पोलिसांनी अहमदाबाद, गुजरात येथून अटक केल्याची माहिती पौर्णीमा चौघुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 यांनी दिली आहे. Vasai Marriage Fraud News त्याने आतापर्यंत 10 ते 12 महिलांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच आरोपी हा दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांच मध्ये सायबर सिक्युरिटी म्हणून काम करत असल्याचे सांगितले आहे.
वालीव पोलीस ठाण्यात आरोपी हिमांशू योगेशभाई पांचाळ (26 वय रा. जनकपुर अहमदाबाद गुजरात) याने पीडित महिलेसोबत शादी डॉट कॉम या संकेत स्थळावरून ओळख करून. फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल व लॉजिंगवर भेटण्यास बोलावुन फिर्यादींच्या इच्छेविरुध्द शारीरीक संबध केले.आरोपीने बनावट हिरे गिफ्ट देवून फिर्यादींचा विश्वास संपादन करुन फिर्यादींकडुन किंमती वस्तु व पैसे घेवुन आर्थिक फसवणुक केली होती. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, यांनी तात्काळ वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकास पाहिजे आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.वरीष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे यालीव पोलीस ठाणेच्या पोलीस पथकाने आरोपीस अहमदाबाद, गुजरात येथुन ताब्यात घेतले. आरोपीकडे नमुद गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला तसेच त्याने अशाच प्रकारचे अनेक गुन्हे करुन 10 ते 12 महिलांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे.
पोलीस पथक
पौर्णीमा चौघुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 वसई,उमेश माने-पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, पोलीस निरीक्षक गोरखनाथ जैद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर, पोलीस हवालदार किरण म्हात्रे, सचिन दोरकर, पांडुरंग कडु, पोलीस नाईक बाळु कुटे, पोलीस शिपाई स्वप्निल तोत्रे, विनायक राऊत, सचिन लांडगे, केतन गोडसे, अक्षय माळी व पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ-2 चे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल, पोलीस शिपाई अमोल बडे, मोहन खंडवी यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.