•राजस्थानमधील आरोपींना वसईत सापळा रचून अटक; गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी
वसई :- मुंबई-गोवा हायवेवर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (कक्ष-3) मोठी कारवाई करत 8 कोटी 4 लाख रुपयांचे 2 किलो 11 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, ते सर्व राजस्थानचे रहिवासी आहेत.
2 किलो हेरॉईनसह 5.65 लाखांची कार जप्त, वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
11 सप्टेंबर, 2025 रोजी गुन्हे शाखा कक्ष-3 चे सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही व्यक्ती वसई (पूर्व) येथील फादरवाडी भागात अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहेत. माहितीची खात्री पटवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने फादरवाडी येथील श्रीपाल-1 टॉवरसमोर सापळा रचला.
रात्रीच्या वेळी एक स्विफ्ट कार तिथे येऊन थांबली असता, पोलिसांनी तातडीने गाडीतील तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे समुंदरसिंग रुपसिंग देवडा (वय 49), युवराजसिंग भवानीसिंग राठोड (वय 28) आणि तकतसिंग करणसिंग राजपूत (वय 38) अशी सांगितली. हे तिघेही राजस्थानमधील सिरोही आणि जोधपूर येथील रहिवासी आहेत.
8 कोटींचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडे असलेल्या बॅगची झडती घेतली असता, त्यांच्याकडे 2 किलो 11 ग्रॅम हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 8 कोटी 4 लाख रुपये आहे. पोलिसांनी हेरॉईनसोबतच 5 लाख 65 हजार रुपये किमतीची स्विफ्ट कार आणि मोबाईल फोन असा एकूण 8 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींविरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात आली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…