Vasai Drug News : वसई पोलिसांकडून अंमली पदार्थांवर मोठी कारवाई; ‘एलएसडी पेपर’ आणि ‘गांजा’ तस्करांच्या दोन स्वतंत्र टोळ्या जेरबंद

Vasai Latest Crime News : 4.40 लाखांचा एलएसडी पेपर विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक; माणिकपूर आणि नायगाव येथे दोन गुन्हे दाखल
वसई/नालासोपारा :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-2 वसई येथील पथकाने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एलएसडी पेपर आणि गांजा विक्री करणाऱ्या दोन टोळ्यांना अटक करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. Vasai Latest Crime News
वसईत एलएसडी पेपरसह दोन आरोपी जेरबंद
गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-2 वसई Vasai Crime Branch Unit 2 येथील सहा. पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे आणि मुकेश पवार यांना मिळालेल्या माहितीवरून, 27 सप्टेंबर 2025 रोजी रात्री उशिरा वसई (पश्चिम) परिसरातून दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपी
देव पंकज मोदी (वय 27) आणि सोहेल युसुफ सय्यद (वय 28).
जप्त मुद्देमाल
त्यांच्याकडे 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचा 0.440 मिली ग्रॅम वजनाचा एलएसडी पेपर (LSD – लिसर्जिक एसिड डायथिले गाईड) हा अंमली पदार्थ आढळून आला.याप्रकरणी दोघांविरुद्ध माणिकपूर पोलीस ठाण्यात NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून माणिकपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
कामन येथे 8 किलो गांजा जप्त, दोन महिलांना अटक
यापूर्वी, 25 सप्टेंबर 2025 रोजी लोपीस वाडी, कामनगाव (ता. वसई) येथे पोहवा अनिल साबळे यांना मिळालेल्या बातमीनुसार कारवाई करण्यात आली. महिला अधिकारी मनिष पाटील (नायगाव पोलीस ठाणे) यांच्या मदतीने सापळा रचून 1 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपी
सुनिल सुभाष पवार (वय 38), आशा सुनिल पचार (वय 31, कल्याण) आणि प्रियंका संतोष कंसारे (वय 26, कामन).
जप्त मुद्देमाल: त्यांच्या ताब्यात 1 लाख 78 हजार 442 रुपये किमतीचा 8.111 किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला.
या तिन्ही आरोपींविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात NDPS ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून नायगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, डीसीपी (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उत्कृष्ट कारवाई करण्यात आली.


