Vasai Drug News : वसई एसटी डेपो परिसरात रचला सापळा; मुंबईच्या कामाठीपुरा भागातील आरोपीला बेड्या
वसई | पालघर आणि वसई-विरार परिसरात अंमली पदार्थांविरुद्ध पोलिसांनी छेडलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. मुंबईतील कामाठीपुरा भागातून वसईत ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला अंमली पदार्थ विरोधी कक्ष-२ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 8 लाख रुपये किमतीचे 40 ग्रॅम मेफेड्रोन (MD) हस्तगत करण्यात आले आहे. Vasai Crime News
एसटी डेपो परिसरात थरार
10 जानेवारी 2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पथक वसई परिसरात गस्त घालत असताना, वसई पश्चिम येथील एसटी बस डेपो जवळ एक इसम संशयास्पद रित्या घुटमळताना दिसला. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने त्याला दोन पंचांसमक्ष ताब्यात घेतले.
झडतीत मिळाले ‘पांढरे सोने’
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनेश बाबुलाल यादव असून तो मुंबईतील कामाठीपुरा येथील भाजी मार्केट परिसरातील रहिवासी आहे. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 40 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (MD) हा अंमली पदार्थ सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत 8 लाख रुपये आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…