क्राईम न्यूज

Vasai Drug News : वसईत 11.50 लाखांचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन नागरिकाला अटक

Vasai Drug News : वसई पूर्वेच्या ओमनगर येथील महेश अपार्टमेंट एव्हर शाईन सिटी येथे अंमली पदार्थ विक्री करत असलेल्या एका नायजेरियन नागरिक असल्याची बातमी गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-3 मिळाली होती.

वसई :-भारतात वास्तव्यास असणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला एमडी (मेफेड्रॉन)या अंमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष-3 वसई पोलिसांनी अटक केली आहे. Vasai Police News या नायजेरियन व्यक्तीकडून 11 लाख 50 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. Vasai Drug मीरा-भाईंदर वसई विरार पाेलिसांच्या अंमली पदार्थ विराेधी पथकाने तसेच गुन्हे शाखा कक्ष-3 वसई यांनी एव्हरशाईनसिटी, वसई पूर्व भागातून अटक केली आहे. डेस्मंड चिडालु ॲनिग्बो (वय 36) असे अटक केलेल्या आराेपीचे नावे आहे. आचोळे पाेलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,डेस्मंड चिडालु ॲनिग्बो रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. एक नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थ विक्री करत असल्याची महेश अपार्टमेंट, तिसरा मजला, अवध अपार्टमेंटच्या मागे, एव्हरशाईनसिटी, वसई पूर्व तस्करी करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विराेधी पथकाला मिळाली होती.त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.डेस्मंड चिडालु ॲनिग्बो याच्याकडून 46 ग्रॅम वजनाचा एम डी (M.D.) मेफेड्रॉन असा एकूण 11 लाख 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस पथक

मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, पोलीस अंमलदार राकेश पवार, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago