क्राईम न्यूजमुंबई
Trending

वसई : घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

Vasai Latest Crime News : घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 8 गुन्ह्यांची उकल झाली

वसई :- मुंबई ,उपनगर आणि मीरा-भाईंदर परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली Vasai Police आहे.त्याच्याकडून 8 गुन्ह्यांची उकल झाली आहे. Vasai Latest Crime News

घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगारांचा सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-3 वसई पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाहूराज रणवरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून आरोपी इम्रान उस्मान शेख (वय 34) आणि मुशीर सलीम खान (वय 40) यांना सापळा रचून अटक केली.

फिर्यादी अली अकबर हकीममुद्दीन थांडलावाला (वय-34) बाभोला नाका, बिहांन्ड हुसैन कॉलनी, वसई प. यांच्या घरी 26 मार्च च्या दरम्यान चोरी झाल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.घराचे बेडरुम मधील कपटाच्या तिजोरीचे लॉक तोडून तिजोरीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकुण 9 लाख 22 हजार 500 रुपयांच्या दस्तऐवज आरोपीने चोरी केली होती.

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त साो (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक / शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, सागर सोनवणे, प्रविण वानखेडे, गणेश यादव सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0