Vasai Crime Branch 2 Busted Gavthi Daru Adda : गुन्हे शाखा कक्ष-2, वसई यांची कारवाई,20 लिटर गावठी हातभट्टीची दारू उध्वस्त
वसई :- वसई पोलीसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 Vasai Crime Branch 2 च्या पोलिसांनी कर्नाळापाडा खाडीलगत तिवराच्या झाडीमध्ये परिसरात सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी दारूसह इतर साहित्य असा 1 लाख 64 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका महिला आरोपी याला अटक केली असून त्याच्याविरोधात नायगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ब), (क), (ड) व (फ) गुन्हा नोंद झाला आहे. Vasai Crime Latest News
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारू, मादक पदार्थ विक्री, अवैध हत्यारांची विक्री होणार नाही याबाबत सर्च ऑपरेशन सुरू आहे. पोलिस ठाण्याचे नायगाव पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष-2 पथकाला कर्नाळापाडा परिसरातील खाडीलगत झाडीमध्ये हातभट्टीची दारू गाळत असल्याची माहीती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली 7 नोव्हेंबर दरम्यान छापा टाकला असता त्याठिकाणी गावठी हातभट्टीची दारू बनविण्याची साधनं, गाळलेली दारू, ड्रम, लोखंडी टाकी, दोन इंजिन असा 1 लाख 64 हजारांचा मुद्देमाल आढळुन आला आहे. पोलिसांनी 4000 लिटर नवसागर गुळ मिश्रीत वॉश,20 लिटर गावठी दारू असा मुद्देमाल जप्त केला असुन महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Vasai Crime Latest News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त साो (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, पोलीस उपनिरीक्षक अजित भास्कर गिते, पोलीस हवालदार जगदीश गोवारी, रमेश आलदर, अमोल कोरे, राजकुमार गायकवाड सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 विरार यांनी पार पाडली आहे. Vasai Crime Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…