Vasai Crime News : नालासोपारा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे मोठे कारवाई ; अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशीय नागरिकांना पोलिसांनी केले अटक
वसई :- भारतात सीएए कायद्यांतर्गत CAA परकीय देशातून घुसखोरी करून भारतात वास्तव्य करणाऱ्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. नालासोपारा पोलिसांच्या Nalasopara Police Station अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाती मोहल्ला वसई या ठिकाणी अनाधिकृतपणे एक महिला आणि दोन पुरुष असे तीन बांग्लादेशीय नागरिक अवैधरित्या राहत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी बातमीचे खातर जमा करत पोलीस पथक घेऊन 16 मे 2024 रोजी हाती मोहल्ला परिसरात छापा टाकत पोलिसांनी पंचायत समक्ष एक महिला आणि दोन पुरुष बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. Vasai Crime News
नालासोपारा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी दिलेल्या माहितीवरून हाती मौहल्ला परिसरात या छापेमारीत दोन बांगलादेशी पुरुष अनेक महिला यांना बेकायदेशीर रित्या भारतात वास्तव्य करण्याप्रकरणे अटक केली आहे. त्यांच्याजवळ भारतात येण्याकरिता कोणत्याही प्रकारचा व्हिजा पासपोर्ट नसुन ते भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून आल्याचे त्यांनी कबुली दिली आहे. अटक केलेले तीनही जण हे बांगलादेशाच्या ढाका येथून भारतात आल्याचे सांगितले आहे. Vasai Crime News
अटक बांग्लादेशीय नागरिकाचे नाव
1.माणिक हालीम शेख (34 वर्ष),पुलना बांग्लादेश.
2.मोहम्मद इलियाज शेख (38 वर्ष), लोकीखुला,सातकीरा ढाका बांग्लादेश
3.फरीदा इलीयाज शेख (38 वर्ष),लोकीखुला,सातकीरा ढाका बांग्लादेश या तीन आरोपींना अटक केली आहे.
महीला व दोन पुरुष बांग्लादेशी आरोपी यांचेचर वसई पोलीस ठाणे Vasai Police Station भारतीय पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3 (अ), 6(अ), सह विदेशी अधिनियम 1946 चे कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार पोलीस हवालदार किणी, शेटये, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, तिवले , पोलीस हवालदार पागी, अनै.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा विभाग यांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. Vasai Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…