Vasai Crime News : घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींच्या आवळल्या मुसक्या
Vasai Crime News Valiav Police Arrested Criminal : वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी ; सराईत घरफोडी, वाहन चोरी करणारे आरोपींना पोलिसांनी केले अटक सात गुन्हे उघडकीस
वसई :- वसई-विरार परिसरात घरफोडी burglary ,मोटर वाहन चोरीचे vehicle theft वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 त्यांनी घरफोडी,चोरी व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस करण्याचे निर्देश दिले होते. शहरातील घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनेचे पोलिसांनी Vasai Police तपास घेण्यास सुरुवात केली होती. तपासाच्या अनुषंगाने दोन सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली असता पोलिसांनी सात गुन्हे उघडकीस आणले आहे. Vasai Crime News
Two accused Arrested For burglary and vehicle theft
फिर्यादी वेदप्रकाश काळुराम व्यास यांचा सातवली वसई येथे धुरी इंडस्ट्रियल इस्टेट यांनी भाड्याने दिलेल्या उघड्या जागेवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या वस्तू बनवण्यासाठी लोखंडी दोन डायचे चोरीला गेली. त्याची किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये असल्याचे फिर्यादी याच्याकडून सांगण्यात आले होते. याची तक्रार व्यास यांनी वालीव पोलिसांना दिली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Vasai Crime News
वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे वाढत असल्याने हे गुन्हे उघडकिस आणण्यासाठी पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 निर्देश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस उपायुक्त उमेश पाटील तुळींज विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वालीव पोलीस ठाणे जयराज रणवरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप गुन्हे प्रकटीकरण विभाग यांचे पथक तयार केले. या पथकाने सलग 10 दिवस सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे शोध मोहीम राबवून आरोपींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन आरोपी असून हे दोन आरोपी खानीवडे परिसरात असल्याचे पोलिसांना कळले होते. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींचे नाव आकाश रवींद्र कदम, आणि साजन शिवराम वळवी, दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे हे दोन्ही आरोपी नाईकपाडा वसई पूर्व येथे राहणारे आहे. पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता आरोपी वसई पूर्व परिसरातून तीन मोटरसायकल, एक सायकल सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल असा एकूण एक लाख 59 हजार 900 रुपये किमतीचा ऐवज चोरी केला आहे. या संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडून सात चोरीचे यशस्वी उकल करण्यात वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश प्राप्त झाले आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. Vasai Crime News
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 2 वसई, उमेश माने- पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, पो.ना. बाळु कुटे, पोलीस अंमलदार विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.