मुंबई

Vasai Crime News : वसईत हत्येचा थरार! झुडपात आढळलेल्या त्या मृतदेहाचे गूढ उकलले; जुन्या वादातून मित्रानेच केला मित्राचा काटा

गुन्हे शाखा कक्ष-2 ची धडाकेबाज कामगिरी; 24 तासांत आरोपी मुसक्या आवळल्या

वसई :- वसई पूर्व येथील गौराईपाडा परिसरात 18 डिसेंबर रोजी एका अज्ञात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. चेहऱ्यावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आलेल्या या निर्घृण हत्येचा छडा लावत वसई गुन्हे शाखेने मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. 4-5 वर्षांपूर्वीच्या कौटुंबिक वादाचा सूड घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नेमकी घटना काय?

मुकुंद नगर येथील एका इंडस्ट्रियल इस्टेटच्या संरक्षक भिंतीपलीकडे घनदाट झुडपात एका 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. मृताच्या अंगावर जखमांच्या खुणा पाहता अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा कक्ष-2 चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने समांतर तपास सुरू केला.

तांत्रिक तपासाने पटली ओळख पोलिसांसमोर पहिले आव्हान होते ते म्हणजे मृतदेहाची ओळख पटवणे. तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने मृत तरुणाचे नाव टाटा किरसुन हेम्ब्रम (30, रा. गोलानी) असल्याचे समोर आले. अधिक तपासात असे समजले की, 17 डिसेंबरच्या रात्री टाटा हेम्ब्रम हा त्याच्या गावाकडील ओळखीचा तरुण कुशनु रामराई हेम्ब्रम याच्या घरी गेला होता.

4 वर्षांपूर्वीच्या वादाचा सूड मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयित कुशनु हेम्ब्रम याला चिंचपाडा येथून ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कुशनुने पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. सुमारे 4 ते 5 वर्षांपूर्वी झारखंडमध्ये असताना त्यांच्या कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्याच जुन्या वादाचा राग मनात धरून कुशनुने टाटा हेम्ब्रम याला गाठले आणि कोयत्याने वार करून त्याची निर्घृण हत्या केली.

यांनी केली यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सपोनि सोपान पाटील, पीएसआय संतोष घाडगे, अजित गिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago