Vasai Crime News : माणिकपुर पोलीस ठाण्यास यश ; हत्या करुन 36 वर्षापासून फरार असलेला आरोपी अटक
•हत्या करून 36 वर्ष फरार आरोपीला पोलिसांनी केले अटक, आरोपी अस्तित्व बदलून परदेशात आणि वसईमध्ये राहत होता
वसई :- 36 वर्षांपूर्वी (30 नोव्हेंबर 1988) रोजी रात्रीच्या दरम्यान नवघर पुर्वेस सलीम अकबर अली यास व्यक्तीला तीक्ष्ण हत्याराने वार करुन जिवे ठार मारले होते.आरोपी नामे 1) विजय सुदाम राणे 2) शंकर बंगाळी माखन 3) धर्मा धर्मेंद्र 4) शेखर पुजारी 5) चंद्रशेखर शेट्टी 6) कुमार होडे 7) धनंजय बोलूर 8) मुन्ना क्लेमेंट सायमन लोबो अशांनी आपसात संगनमत करुन जिवे ठार मारले होते. म्हणून वसई पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.क 302,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयात आरोपी क्र. 1 ते 6 यांना अटक करण्यात आली होती. परंतू आरोपी क्रमांक 8 मुन्ना क्लेमेंट सायमन लोबो हा गुन्हा घडल्यापासून फरार असून आपले असत्तिव लपवत असल्याने तो आरोपींच्या यादी मध्ये मुख्य आरोपी होता. Vasai Crime News
पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 2 यांनी विशेष मोहीम राबवुन पाहिजे व फरार आरोपींचा घेवून अटक करण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले होते. शोध वरीष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे माणिकपुर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने तसेच दहशतवाद पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद वाघ यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गुप्त बातमीदारांकडून प्राप्त माहीतीचे आधारे आरोपी नामे क्लेमेंट सायमन लोबो ऊर्फ मुन्ना (55 वर्षे), माणिकपूर तलखल वसई प. ता. पालघर यास त्याचे राहते परीसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता मयत इसम नामे सलीम अकबर अली याचे व पाहिजे आरोपी क्लेमेंट सायमन लोबो ऊर्फ मुन्ना यांचे मध्ये पूर्वी वाद होते व त्या वादाचे कारणावरुन त्याचा खुन करुन तो मागील 36 वर्षापासुन परदेशात वास्तव्य करुन त्यानंतर तो वसई येथे आपले अस्तित्व लपवून राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. Vasai Crime News
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, पद्मजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वसई विभाग यांचे मागदर्शनाखाली राजू माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच दहशतवाद पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद वाघ, पोलीस हवालदार अव्हाड, प्रशांत पाटील यांनी केली आहे. Vasai Crime News