Vasai Crime News : माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश ; चोरी करणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत केले जेरबंद
Vasai Crime News : वसईमध्ये दुकानांमध्ये चोरी, चोरीमध्ये विदेशी चलन आणि मोबाईल फोन चोरीला, आरोपीला 24 तासाच्या अटक, आरोपी सोबत अल्पवयीन मुलाचा चोरीमध्ये सहभाग
वसई :- माणिकपूर पोलीस ठाण्याच्या Manikapur Police Station हद्दीत अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Akbar Travels OF PVT LTD Robbery Case ) या ऑफिसमध्ये 22 मे च्या दरम्यान दुकानात कोण नसताना अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर सोडत आत मध्ये प्रवेश करून ऑफिस मधील रोख रक्कम मोबाईल फोन चोरी झाल्या बाबतची तक्रार विशाल विजय तायडे (38 वर्ष) यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपीला मुंबईच्या अंधेरी परिसरातून अटक केली असून त्याच्यासोबत अल्पवयीन तरुणाचाही या गुन्ह्यांमध्ये सहभागी झाला होता. Vasai Crime News
सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने आरोपीला अटक
माणिकपूर पोलिसांनी तक्रारदार यांच्या तक्रारीवरून कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या घटनेबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून गुन्हयाचे घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासून त्याव्दारे आरोपी याचा मागोवा घेवून आरोपी नावे राहुल राजु तायडे ऊर्फ पंखा फास्ट, (20 वर्षे),डिलेव्हरी बॉय, (रा. आय.टी.आय मराठा हॉटेलच्या बाजुला,अंधेरी पूर्व,) मुंबई यास 24 तासाचे आत अंधेरी पूर्व परिरातुन ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. आरोपी याचेकडे कौशल्याने विचारपुस करता त्याने अल्पवयीन बालकासह गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून रोख रक्कम, मोबाईल फोन व विदेशी चलन असा एकुण अं.किं. 90 हजार 282 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Vasai Crime News
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले/श्रिगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 02, पद्मजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई,राजु माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष चौधरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, पोलीस शिपाई गोंविद लवटे, आनंदा गडवे, प्रविण कांदे, महिला पोलीस शिपाई शिंदे, पूजा कांबळे व पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ 02 चे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल, पोलीस शिपाई अमोल बर्डे, यांनी यशस्विरीत्या पार पाडली आहे. Vasai Crime News
Web Title : Vasai Crime News: Success of Manikpur Crime Detection Team; The accused of stealing was jailed within 24 hours