Vasai Crime News : दरोडा घालणारी सराईत टोळी गजाआड; 5 आरोपींना अटकेत
Vasai Crime News : माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पोलिसांची धडक कारवाई दरोडा घालून जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला 36 तासात पोलिसांनी केले जेरबंद
वसई :– माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पोलिसांनी दरोडा घालून चोरी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.टोळीतील 5 आरोपींना माणिकपूर पोलिसांनी सराईत कट रचून दरोडा घालण्याच्या आरोपात अटक केली आहे.अजय बलराम मंडल,शंकर मंजू गौडा,विजय सुरेश सिंग,मोहम्मद जुवेर नूरमोहम्मद शेख,लालमणी दोरिकामहतो यादव अशी अटक पाच आरोपींची नावे आहेत. Vasai Latest Crime News
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी के एंटरप्राईजेस ऑफिस, वसई येथे 19 ऑगस्ट च्या दरम्यान येथे तक्रारदार काम करत असताना पाच अनोळखी व्यक्ती आत मध्ये प्रवेश करून त्यामधील एका व्यक्तीने बॅगेमधील बंदूक काढून त्याच्या डोक्याला लावले. म्हणाला की,”चिल्लाया तो तेरेको ठोक डालेगा, तेरे पास पैसा वैसा है सब बाहर निकाल”दुसऱ्या व्यक्तीने बॅगमधील मोठा चॉपर बाहेर काढून तक्रारदार यांचे मानेला लावून ऑफिसमधील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेल्या रकमेची शोधाशोध सुरु करुन फिर्यादी यांचे हात पाय बांधुन व जीवे मारण्याची धमकी देऊन एकूण रु 73 हजार 700 रुपयांचे दोन मोबाईल, रोख रक्कम व डीव्हीआर जबरी चोरी करुन पळूण गेलेबाबतची तक्रारदार सिद्धराज कर्शन राजपूत, (22 वर्षे) यांनी दिली.तक्रारीवरुन माणिकपूर पोलीस ठाणे येथे कलम 310(2), 311,309 (6),351 (2), 2 (5) भा.न्या.सं. सह आर्म ॲक्ट 3,4,25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Vasai Latest Crime News
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरिता माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच सुमारे 100 हुन अधिक ठिकाणाचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासून व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी हे संतोषभुवन, नालासोपारा पूर्व परिसरात राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेतले आहे.सराईत आरोपी यांचे टोळीकडून एकूण 3 लाख 14 हजार 800 रुपयांचे किंमतीचे ॲटोमॅटिक बंदूक, 08 जिवंत काडतुस, इको कार, चॉपर, चाकू, कटर मशिन, हॅण्डल बार त्याचे शॉकेट, पाने, स्क्रू ड्राईव्हर, पक्कड, कटर, हातोडी, चाच्या, मोबाईल फोन इ. साहित्य निवेदन मेमोरंडम पंचनाम्याने जप्त करण्यात आले आहे.
तसेच आरोपी शंकर मंजू गौडा कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात 10 गुन्हे दाखल आहे. आरोपी विजयसिंग सुरेशसिंग ठाकुर याच्या विरोधात गुजरात ठाणे आणि मुंबई येथे पाच गुन्हे दाखल आहे. आरोपी अजय बलराम मंडल याच्या विरोधात ठाणे आणि मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत सहा गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी टोळीकडून चार गुन्हे उघडकीस आणले आहे. Vasai Latest Crime News
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले श्रिंगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 02, नवनाथ घोगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई, राजु माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,संतोष चौधरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर सावळे, पोलीस हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, पोलीस शिपाई गोविंद लवटे, आनंदा गडदे, प्रविण कांदे, महिला पोलीस शिपाई पुजा कांचळे व पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ 02 चे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल, पोलीस शिपाई अमोल बडे,मोहन खंडवी यांनी यशस्विरीत्या पार पाडली आहे.