क्राईम न्यूज

Vasai Crime News : ट्रान्सफार्मर मधून कॉपर आणि ऑइल चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड

Vasai News Pelhar Police Arrested Transformer Wire Stoller : पेल्हार पोलीस ठाण्याचा गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी ; सराईत चोरी करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

वसई :- वसईच्या सागर कंपाऊंड ,पेल्हार गाव येथे ट्रान्सफॉर्मर मधून कॉपर Transformer Wire Stoller आणि ऑइल चोरी झाल्याची घटना पेल्हार पोलीस ठाण्यात Pelhar Police Station तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी एका सराईत टोळीला अटक करून जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हयात चोरी केलेल्या मालापैकी 380 किलो वजनाचे 3 लाख 80 रुपये किंमतीचे कॉपर Copper Stolen From Transformer पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत करण्यात आले आहे. प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. Vasai Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,असीम अरिफ नंदोलिया (41 वर्ष) सागर कंपाऊन्ड, पेल्हार गाव,वसई या ठिकाणी असलेल्या ट्रान्सफॉर्मर च्या बाजुला लावलेली लोखंडी जाळे कट करुन त्यावाटे आत प्रवेश करुन एकुण 6 लाख 99 हजार रुपये किंमतीचा ट्रॉन्सफॉर्मर मधील कॉपर व ऑईल असा मुद्देमाल चोरुन नेलेबाबत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेतात पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला घडलेल्या घटनेबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या. गुन्हे प्रकटीकरण विभागाने या टोळीचा शोध घेत असताना सीसीटीव्ही च्या मदतीने चार आरोपी लाल कारमधून आले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या मार्फत पेल्हार ते शिळफाटा असा पाठलाग करून आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी ठाणे आणि उत्तर प्रदेशातून आरोपींना ताब्यात घेतले आहे.तसेच चोरी केल्याबाबतची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेल्या मालापैकी 380 किलो वजनाचे तीन लाख 80 हजार रुपयांचे कॉपर पोलिसांनी हस्तगत केले आहे. आरोपींच्या विरोधात यापूर्वीही पेल्हार पोलीस ठाण्यात दोन तर अंबरनाथ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. आरोपींनी कॉपर चोरीचे इतरत्र गुन्हे दाखल असून आरोपी यांनी अंबरनाथ, डोंबीवली, तळोजा, येथे देखील ट्रान्सफार्मरमधील तांबे व ऑईल चोरी केले असल्याचे तपासात सांगितले आहे. Vasai Crime News

पोलीस पथक

जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -3, विरार,बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शकील शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन) पेल्हार पोलीस ठाणे, पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मीक पाटील, मिथुन मोहिते पोलीस अंमलदार रवि वानखेडे, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहूल कर्पे, दिलदार शेख, अभिजित नेवारे, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Vasai Crime News

vivek

Share
Published by
vivek
Tags: Abhijit NewareAnil SableAnil ShegararrestAsim Arif NandoliaBajrang DesaiCase filingCCTV footageCopperCopper Stolen From TransformerCrimeCriminal gangDiladar SheikhinvestigationJayant BajbaleJitendra WankhadeKiran AvhadKumar Gaurav DhadavdmaharashtraMithun MohiteNikhil MandlikOilPelhar Police StationPolice ActionPolice TeamRahul KarpeRavi WankhedeShakil SheikhSharad RathodSopaan PatilSujay PatilTanaji ChavanTheftTransformer theftTransformer Wire StollerTukaram BhopaleUttar PradeshValmik PatilVasai Crime NewsVehicle chaseYogesh Deshmukhअटकअनिल शेगरअनिल साबळेअभिजित नेवारेअसीम अरिफ नंदोलियाउत्तर प्रदेशऑईलकिरण आव्हाडकुमारगौरव धादवडकॉपरगुन्हागुन्हा दाखलचोरीजयंत बजबळेजितेंद्र वनकोटीट्रान्सफार्मर चोरीतपासतानाजी चव्हाणतुकाराम भोपळेदिलदार शेखनिखील मंडलिकपेल्हार पोलीस ठाणेपोलिसांची कारवाईपोलीस पथकबजरंग देसाईमहाराष्ट्रमिथुन मोहितेयोगेश देशमुखरवि वानखेडेराहूल कर्पेवाल्मीक पाटीलवाहनाचा पाठलागशकील शेखशरद राठोडसराईत टोळीसीसीटीव्ही फुटेजसोपान पाटील

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago