Vasai Mandavi police Busted Daru Adda : मांडवी पोलिसांची धडक कारवाई, पारोळ आणि खार्डी कोशिंबे येथील जंगलात टाकले छापे
वसई :- वसई-विरार शहराला अवैध व्यवसायांपासून मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत मांडवी पोलिसांनी मोठी कारवाई करत पारोळ आणि खार्डी कोशिंबे येथील जंगलात चालवल्या जाणाऱ्या गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्धवस्त केल्या आहेत. या कारवाईत हजारो लिटर दारूचा साठा आणि निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य नष्ट करण्यात आले असून, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Vasai Latest Crime News
जंगल आणि कांदळवनात हातभट्ट्या
वसई-विरार शहरात अमली पदार्थांची तस्करी, अवैध दारू विक्री आणि गावठी हातभट्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त मधुर वर्मा यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार, मांडवी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, पारोळ आणि खार्डी कोशिंबे येथील दुर्गम जंगल परिसरात गावठी दारूच्या भट्ट्या सुरू आहेत. या माहितीच्या आधारे मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन्ही ठिकाणी छापे टाकले.
पोलिसांनी जंगलात लपवलेल्या अनेक हातभट्ट्या शोधून काढल्या. या भट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणावर गावठी दारूची निर्मिती केली जात होती. पोलिसांनी दारूचा कच्चा माल, तयार दारू आणि निर्मितीचे साहित्य असे लाखो रुपयांचे साहित्य जागेवरच नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. यापूर्वीही पोलिसांनी पाणजू बेट आणि मालजीपाडा येथील कांदळवन भागात कारवाई करून अशा अनेक भट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. पोलिसांची ही मोहीम भविष्यातही सुरूच राहणार असून, शहराला अवैध धंद्यांपासून मुक्त करण्याचा पोलिसांचा निर्धार आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…