•युट्युब व्हिडिओ, लाईक स्टार, मूव्ही रेटींग वर्क फ्रॉम होम असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक
वसई :– ऑनलाइन द्वारे फसवणूक होणाऱ्या घटना सातत्याने वाढत असताना मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील काशिगाव पोलीस ठाणे परिसरातील त्यागराज बांदेकर (48 वर्ष) यांना वर्क फ्रॉम होम च्या नावाने फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये बांदेकर यांना वर्क फ्रॉम होम च्या नावाने युट्युब व्हिडिओ,लाईक, स्टास्क ऑनलाइन हॉटेल नावाने आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. पाच लाखाहून अधिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली असून काशिगाव पोलिसांच्या सायबर विभागाने पाच लाखाहून आर्थिक रक्कम तक्रारदार यांना परत देण्यात यश आले आहे.
आर्थिक फसवणूक सायबर विभागाकडून आर्थिक रक्कम परत
मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या आयुक्तालयातील काशिगाव पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या बांदेकर यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून काशिमीरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या भादवी कलम 420,34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 66 (सी),66 (डी), प्रमाणे गुन्हा दाखल करून सायबर विभागाने तक्रारदार यांच्या बँकेकडून आरोपीच्या खात्यात जी रक्कम वळवण्यात आली होती ते गोठवण्यास यश आले आहे. गोठवलेले रक्कम बँकेबरोबर पत्रव्यवहार करून ती परत देण्यास पोलिसांना यश आले. तसेच पोलिसांनी साक्षीदार त्यागराज बांदेकर यांच्या फसवणुकीतील आठ लाख पंधरा हजार रकमेपैकी पाच लाख पंचवीस हजार रक्कम खात्यावर बलात करण्यास यश आले आहे.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-02, मिरारोड, विजयकुमार मराठे, सहाय्यक, पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…