•1.668 किलो अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक; पालघर जिल्ह्यात खळबळ
वसई :- अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने एक मोठी आणि लक्षणीय कारवाई केली आहे. गुप्त बातमीच्या आधारावर पोलिसांनी 1 किलो 668 ग्रॅम वजनाचा, सुमारे 36 हजार 600 रुपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका पती-पत्नीला जेरबंद केले आहे.
कारवाईचा तपशील
नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर बाबा दर्गाजवळ, रामवाडी, गोरातपाडा, चिंचोटी (ता. वसई) येथे 6 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. सपोनि गणेश केकान यांना गांजाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक अभिजीत मडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये सुषमा पप्पू विश्वकर्मा (वय 30) आणि पप्पू राजनाथ विश्वकर्मा (वय 35, मूळ रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) या दोघांचा समावेश आहे. त्यांच्या कब्जात बेकायदेशीररित्या गांजा आणि मोबाईल असा एकूण 51 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दोघांविरुद्ध नायगाव पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (सी), 20 (ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप आयुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाण्याचे पथकानी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…