•बांधकाम व्यवसायाला चुना लावणारे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त; ट्रेलरमधून माल ‘पलटी’ करतानाच गुन्हे शाखेची धडक कारवाई
वसई/पालघर :- बांधकाम व्यवसायाच्या वस्तूंची चोरी करून त्यांची अवैधपणे विक्री करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा वसई गुन्हे प्रकटीकरण कक्ष-2 ने पर्दाफाश केला आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे वसई गुन्हे शाखेने अग्रवाल नगरीजवळ सापळा रचून 6 आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे.
11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्रीच्या वेळी मोकळ्या मैदानात काही इसम दोन मोठ्या ट्रेलरमधून बेकायदेशीररित्या स्टील चोरी करून, ते एका छोट्या टेम्पोमध्ये ‘पलटी’ करत असताना पकडले गेले. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 09 हजार किंमतीच्या 1200 किलो वजनाच्या स्टील सळ्या जप्त केल्या. यासोबतच चोरीसाठी वापरलेले 30 लाख किमतीचे दोन ट्रेलर आणि चोरीचा माल नेण्यासाठी वापरलेला 10 लाख किमतीचा टाटा एस टेम्पो, तसेच मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 40 लाख 90 हजार 900 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाडा येथील रिजेन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून भरलेला माल नालासोपारा येथील हितेश स्टील सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेडकडे खाली करण्याकरिता आणला जात होता. त्यादरम्यानच, संधी साधून हे आरोपी स्टीलची चोरी करत होते. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींमध्ये स्टील खरेदी-विक्रीचा व्यावसायिक, ट्रेलर चालक आणि हेल्पर यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींविरुद्ध आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पालघर पोलिसांना हे एक मोठे यश मानले जात आहे.
अटक आरोपींची नावे
अच्छेलाल जगमोहन मौर्या (व्यवसाय स्टील खरेदी विक्री, रा. नालासोपारा पूर्व)
राकेश रामजित उपाध्याय (व्यवसाय चालक, रा. नालासोपारा पूर्व)
दिनदयाळ लालबहादुर पांडे (व्यवसाय हेल्पर, रा. भिवंडी, जि. ठाणे)
यानूर अफसरअली शेख (व्यवसाय चालक, रा. अँटॉप हिल, मुंबई)
शुभम राजेश सिंग (रा. आंबिवली, जि. ठाणे)
जावेद साहिद शेख (व्यवसाय चालक, रा. विरार पूर्व)
हे स्टील वाडा येथील रिजेन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून भरलेले होते आणि ते नालासोपारा येथील हितेश स्टील सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेडकडे खाली करण्याकरिता आणले जात होते. या आरोपींविरुद्ध आचोळे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) आणि 3(1) प्रमाणे गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.
यशस्वी कामगिरी करणारे अधिकारी
पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-2, वसई युनिटचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील आणि त्यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…