Vasai Police Arrested Drug Seller : चरस आणि गांजा विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक; 37.51 लाखांचा मुद्देमाल जप्त
वसई/भिवंडी :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वसई आणि भिवंडी परिसरातून दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चरस आणि गांजा या दोन्ही प्रकारचा अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 37 लाख 51 हजार 080 इतकी आहे. Vasai Police News
70 वर्षीय आरोपीकडून चरस जप्त
दिनांक 08 ऑक्टोबर रोजी वालीव पोलीस ठाणे हद्दीतील वसई पूर्व, खैरपाडा येथे इरफान सुलेमान खत्री (वय 70) नावाचा एक वृद्ध व्यक्ती त्याच्या घरातून चरस नावाचा अंमली पदार्थ विक्री करत असल्याची गोपनीय माहिती वालीव पोलिसांना मिळाली.
पोलीस उप आयुक्त वसई-2 यांच्या आदेशानुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने खैरपाडा, चिंतामणी कंपाऊंडमधील मोमीन चाळीतील आरोपी इरफान खत्री याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून 1 किलो 88 ग्रॅम (1088 ग्रॅम) वजनाचा चरस अंमली पदार्थ, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 16 लाख 37 हजार 080 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुख्य पुरवठादार भिवंडीतून जेरबंद
इरफान खत्री याच्याकडे कसून तपास केला असता, त्याला हा अंमली पदार्थ पुरवणारा आरोपी तबरेज अमीन मियान खान (वय 25, रा. भिवंडी) याचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ तबरेज खान याला वालीव, वसई पूर्व परिसरातून ताब्यात घेतले.
तबरेज खान याच्याकडून तपासणीदरम्यान 1 किलो 386 ग्रॅम वजनाचा चरस आणि 1 किलो 50 ग्रॅम (1050 ग्रॅम) वजनाचा गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त मुद्देमालाचा तपशील
एकूण किंमत: 37 लाख 51 हजार 080
चरस: 2 किलो 74 ग्रॅम
गांजा: 1 किलो 50 ग्रॅम (1.050किलो)
या दोन्ही आरोपींविरुद्ध वालीव पोलीस ठाणे येथे ‘एनडीपीएस ॲक्ट’ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उप आयुक्त पोर्णिमा चौघुले श्रींगी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…