मुंबई

Vasai Crime News : उत्तर प्रदेश पोलीसांच्या मदतीला महाराष्ट्र पोलीस, 50 हजाराचे बक्षीस असलेल्या सराईत आरोपीला केले अटक…

• Vasai Crime News नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी ; उत्तर प्रदेश मधील सराईत आरोपीला केले अटक, आरोपीवर 50 हजाराचे बक्षीस, उत्तर प्रदेश पोलीस, नायगाव पोलीस यांच्याकडे आरोपीला अटक

वसई :- उत्तर प्रदेश मधील अयोध्या येथील कोतावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांची गॅंग होती. दिवसाढवळ्या कारमधील गाडीच्या काचा फोडून रोख रक्कम, लॅपटॉप, ती वस्तू याच्या चोरी करत असेल. याबाबतच्या तक्रारी कोतावली पोलीस ठाणे उत्तर प्रदेश, येथे दोन गुन्हे आणि कैट पोलीस ठाणे येथे एक गुन्हा आरोपींच्या विरोधात होते. परंतु आरोपीच्या ही स्थानिक लोकांना दहशत निर्माण करत असल्याने त्यांच्या विरोधात कोणीही साक्षी द्यायला तयार नव्हते. पोलिसांनी यापूर्वीच तीन आरोपींना अटक केली असून या मधला मुख्य सूत्रधार असलेला चौथा आरोपी हा वसई परिसरात राहत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी वसईच्या नायगाव पोलिसांच्या मदतीने तसेच ठाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या मदतीने उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर 50 हजार रुपयांचे बक्षीस उत्तर प्रदेश जिल्हाधिकाऱ्याने जाहीर केले होते. यांच्या टोळीतील उपेंद्र सोनी, रोहित पांडे, शेखर मिश्रा या आरोपींना अटक केली असून यातील मुख्य आरोपी असलेला रहीम मुल्ला अन्सारी हा तिथून पळ काढून फरार होता. जवळपास दोन वर्ष पासून आरोपी हा उत्तर प्रदेश राज्यातून फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

दोन वर्षापासून फरार आरोपीला पाटील वाडा येथून अटक

उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफ (फील्ड युनिट प्रयागराज) पोलिसांना आरोपी हा वसईच्या चिंचोटी परिसरात राहत असल्याबाबतची खात्रीदायक बातमी मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी नायगाव पोलीस ठाणे येथील मदत मागितले वरिष्ठ पोलिसांनी नायगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि एसटीआय उत्तर प्रदेश राज्य यांच्या दोन वेगवेगळ्या पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केले. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी हा साडी कंपाऊंड चिंचोटी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून आरोपी रहीमुल इब्राहिम अन्सारी (32 वर्ष) याला पाटील पाडा चिचोटी वसई या ठिकाणाहून अटक केली असून पोलिसांनी मोठ्या कौशल्याने चौकशी केली असता आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे कबुली दिले आहे. नायगाव पोलिसांनी आरोपीला अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांना ताब्यात दिले आहे.

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आरोपीच्या विरोधात तुळींंज पोलीस ठाणे, नालासोपारा पोलीस ठाणे, अर्नाळा पोलीस ठाणे, मणिकपुर पोलीस ठाणे, वसई पोलीस ठाणे व विरार पोलीस ठाणे येथे सन 2016 पासून 27 गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

पोलीस पथक
पौणिमा चौगुले पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 2 वसई, पदमजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर, पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे (प्रशासन) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, पोलीस अंमलदार सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील,सिध्देश्वर क्षिरसागर व ए.टी.एफ पथक प्रयागराज (राज्य उत्तरपद्वेश) यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली दोन वर्षापासून फरार आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी नायगाव पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts