Vasai Crime News : अपहरण, खुन कविता बाडला हत्या प्रकरणातील चारी आरोपींना जन्मठेप
Vasai Crime News : वसई सत्र न्यायालयाने एका महिलेसह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मे 2016 मध्ये अपहरण करण्यात आले होते त्यानंतर खंडणी आणि हत्या अशी घटना यादरम्यान घडली होती
वसई :- विरारमधील कविता बाडला या तरुणीच्या अपहरण, खंडणी आणि हत्या प्रकरणात गुरूवारी वसई सत्र न्यायालयाने एका महिलेसह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. Vasai Crime News मे 2016 मध्ये 30 लाखांच्या खंडणीसाठी कविताचे अपहरण करण्यात आले होते. तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून जाळण्यात आला होता. याप्रकरणी किसनलाल सुंदरलाल कोतारी अर्नाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कविता बाडला (27 वय ) ही तरुणी नोकरी लावणार्या प्लेसमेंट कंपनीत काम करत होती. 15 मे 2016 रोजी तिचे अपहरण करण्यात आले होते. त्याच दिवशी तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर डहाणूच्या कासा रोडवरील साखरा घाटीत तिचा मृतदेह एका सुटकेस मध्ये टाकून जाळण्यात आला होता. तिची हत्या केल्यानंतर तिच्याच मोबाईलवरून आरोपींनी कविताच्या वडिलांकडून 30 लाख रुपये आणि 3 किलो सोने आदी खंडणी मागितली होती. या प्रकऱणी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य आरोपी मोहितकुमार भगत (25 वय) याच्यासह त्याचे साथीदार रामअवतार शर्मा (26 वय ), शिवकुमार शर्मा (25 वय ), मनीष वीरेंद्र सिंग (36 वय ), युनिता रवी (35 वय) या सर्वाना अटक केली होती.
गुरूवारी वसईच्या सत्र न्यायालयात या प्रकरणाचा निकाल दिला. कविताचे अपहरण करून खंडणी मागणे, तिची हत्या करणे, पुरावा नष्ट करणे आदी सर्व प्रकरणात चौघे आरोपी दोषी आढळले. आरोपींना हत्या करणे, पुरावा नष्ट करणे आदी प्रकरणात जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. महिला आरोपी युनिता सिंग हिला जन्मठेप तसेच कलम 386 अंतर्गत 5 वर्ष तर कलम 201 अंतर्गत 3 वर्ष शिक्षा सुनावली आहे. आरोपींनी या शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. याशिवाय मयत कविताच्या कुटुंबियांना 61 हजार रुपायंची नुकसान भरपाई देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती एस व्ही खोंगल यांनी ही शिक्षा सुनावली. ॲड जयप्रकाश पाटील यांनी सरकारी वकिल म्हणून न्यायालयात बाजू मांडून युक्तिवाद केला. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -3, विजय लगारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग,अर्नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दशवंतराच, पोलीस हवालदार खांडेकर, पोलीस अंमलदार घरत यांनी न्यायालयासमोर भक्कम पुरावे आणि साक्षीदार हजर केल्याने आरोपींना जन्मठेप झाली आहे.