Vasai Latest Crime News : पेल्हार पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 1.72 लाखांची चोरी केलेली वाहने आणि पार्ट्स हस्तगत
वसई | वसईच्या नालासोपाऱ्यात मोटरसायकल चोरांचा सुळसुळाट Motorbike Thief Criminal असतानाच पेल्हार पोलिसांनी Pelhar Police एक मोठी कारवाई करत सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. पाच मोटरसायकली चोरी करून त्यातील काहींचे पार्ट्स विक्रीसाठी तयार ठेवणारा वसिम शेख अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. Vasai latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,4 मे 2025 रोजी वाकणपाडा येथील आयान मेडिकल समोरून एका तरुणाची हिरो एचएफ डिलक्स (MH-48/CG 4734) मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. तपासात ही चोरी सराईत पद्धतीने केल्याचे स्पष्ट झाले. पेल्हार पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोहीम हाती घेतली आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित वसिम शेख (30 वय ,रा. नालासोपारा, मुळ रा. हरियाणा) याच्या गॅरेजवर छापा टाकण्यात आला.
गॅरेजमध्ये सुरू होता चोरीच्या गाड्यांचा ‘कटिंग ऑपरेशन’!
छाप्यात वसिमच्या ताब्यातून तब्बल 1 लाख 72 हजार 100 किंमतीच्या तीन मोटरसायकली आणि इतर सुटे भाग जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्याने दोन महिन्यांत पाच मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. यातील दोन गाड्या तोडून त्यांचे पार्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी विकण्यासाठी ठेवले होते.
या कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये खळबळ उडाली असून, पेल्हार पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपीशी संबंधित आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे (मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय), पोलीस उप आयुक्त जयंत बजबळे (परिमंडळ-3, विरार), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (विरार विभाग), चरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक दिलीप राख, पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश देशमुख, पोलीस हवालदार तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, रवि वानखेडे, किरण आव्हाड, दिलदार शेख, पोलीस अंमलदार अभिजित नेवारे, शरद राठोड, वसिम शेख (सर्व नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे) यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…