Vasai Virar Latest Crime News : वसई-विरारमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घटना; कारची धडक लागल्याने चोरटे थांबले, दोघांना अटक
मुंबई :- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावातून गुरांना गुंगीचे औषध देऊन चोरून नेणाऱ्या एका टोळीचा गावकऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास विरारच्या शिरसाड नाका येथे गावकऱ्यांनी या टोळीला रंगेहात पकडून त्यात असलेल्या मुक्या जनावरांची सुटका केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. Vasai Latest Crime News
वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या कडेला अनेकदा जनावरे बसलेली असतात. याच जनावरांना गुंगीचे औषध देऊन चोरून नेण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. बुधवारी पहाटे 5 च्या सुमारास याच महामार्गावरून एक भरधाव कार जात असताना तिचा एका वाहनाला धक्का लागला. त्यामुळे ती कार थांबली.
त्यावेळी गावकऱ्यांनी पाहिले असता कारमध्ये दाटीवाटीने चार जनावरे कोंबून भरलेली होती. याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी जमा झाले. नागरिकांनी कारमधील एक गाय आणि तीन वासरांना बाहेर काढले. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी चोरट्यांना चांगलाच चोप देत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.
अब्दुल वाहिद आणि बिलाल शेख अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी सोडवलेल्या गायीसह वासरांना शिवणसई येथील गोशाळेत नेण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वीही खानिवडे गावातील वस्तीतून गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन अशाच प्रकारे चोरून नेण्याचा प्रकार समोर आला होता. मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी या घटनेची माहिती दिली असून, पुढील तपास सुरू असल्याचे म्हटले आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…