Vasai Latest Crime News : वसई-विरार महानगरपालीकेतील एका वरिष्ठ अधिकारी यांचा फोटो मॉर्फ करून बदनामी करणाऱ्या तसेच कुटुंबीयातील सदस्यांची बदनामी करण्याची धमकी देणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक
वसई :- वसई विरार महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे छायाचित्राचे मॉर्फ करून अश्लील फोटो तयार करून बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Vasai BMC News आरोपीला बोळींज पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, कुटुंबाचेही फोटो याचप्रमाणे व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या विरोधात बदनामी, धमकी दिल्या प्रकरणी बोळींज पोलीस ठाणे फिर्यादी यांनी भा.न्या.सं. कलम 351(2), 356 (2) सह माहिती तंत्रज्ञान अधि. कलम 66 (सी), 67 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे अनुषंगाने पोलीस उप आयुक्त गुन्हे,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये नमुद गुन्हयाचे समांतर तपासादरम्यान तांत्रीक विश्लेषण व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीचे सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.आरोपी चंदन सूर्यभान सिंह ऊर्फ चंदन ठाकूर,( वय 32 , रा.ग्लोबल सिटी, विरार पश्चिम,) याला दिनांक 18 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच, आरोपीने अधिकाऱ्याच्या फोटोतील चेहरा हा एका न्यूड साईटवरील स्त्री पुरुषांच्या फोटोवर स्त्रीच्या जागी चिटकवुन (मॉर्फ) करुन फोटो हा संबधीत आधिकारी यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने केल्याचे सांगितले आहे. आरोपीवर एकूण 15 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त,दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त ,अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त , (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक / सुजितकुमार गुंजकर सायबर पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षकशाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, म प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-३ यांनी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण,मिलाग्रीस फर्नांडिस, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, स्नेहल पुणे पोलीस अंमलदार शुभम कांबळे, कुनाल सावळे, विलास खाटीक, राहुन बन, सावन शेवाळे सर्व सायबर पोलीस ठाणे यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…