• Vasai Woman broker caught red handed for prostitution business व्हॉट्स एप वर तरुणींचे फोटो पाठवून नंतर मीरा भाईंदर मधील लॉज बुक करायला लावून वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्या महिला दलालवर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वसई :- व्हॉट्स एप वर तरुणींचे फोटो पाठवून नंतर वसई विरार मधील लॉज बुक करायला लावून वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्या एका महिला दलालांवर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष चे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना महिला वेश्या दलाल बाबत माहिती मिळाल्या नंतर बोगस गिऱ्हाईक द्वारे तिच्याशी संपर्क केला तिने वेश्या व्यवसायासाठी हॉटेल वेस्टर्न इन फॅमिली रेस्टॉरंट बाभोळा, डी मार्ट समोरील वसई पश्चिम या ठिकाणी आणले पोलिसांनी सापळा रचून वेश्या दलाल महिलेला ताब्यात घेतले आहे. कार्तिकी किरण पवार (35 वय) असे वेश्या दलाल महिलेचे नाव आहे. तिच्यावर वसई पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 143 (2) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पोलिसांनी महिला आरोपीला ताब्यात घेतले असून त्या महिलेच्या ताब्यातून दोन पिडीत तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणी सहाय्यक फौजदार उमेश गवई यांनी सरकारतर्फे पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली आहे.
पोलीस पथक पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) भास्कर पुकळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, सहाय्यक फौजदार उमेश गवई, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार रोशन किणी, महेंद्र शेट्ये,अमित चव्हाण, महिला पोलीस हवालदार सुप्रिया तिवले, पोलीस हवालदार श्याम शिंदे, सुनिल पागी, सर्व नेमणुक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…