Vasai Crime Branch Unit 2 Arrested Murder : गुन्हे शाखा कक्ष-2 ची धडाकेबाज कारवाई; किरकोळ वादातून भावानेच भावाचा घेतला जीव
वसई | वसईच्या सातीवली परिसरात सख्या भावानेच भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर मायदेशी म्हणजेच नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला वसई गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन तासांत शिताफीने अटक केली. Vasai Latest Crime News
नेमकी घटना काय?
सातीवली येथील तुंगारफाटा परिसरातील डॉल्फीन हॉटेलमध्ये राहणारा मयत योगेश मोहनबहादूर नेपाली (35 वय) आणि त्याचा सख्खा भाऊ सुरज मोहन बहादूर नेपाली (30 वय) यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात सुरजने योगेशला जोरात धक्का देऊन जमिनीवर पाडले आणि त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी इतकी निर्दयी मारहाण केली की योगेशचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची गरुडझेप
2 तासांत आरोपी जेरबंद घटनेची माहिती मिळताच पेल्हार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा कक्ष-2 वसईचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती आणि आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) यांच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. आरोपी सुरज नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
यांनी केली कारवाई ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा कक्ष-2 चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, संतोष घाडगे, अजित गिते आणि त्यांच्या पथकाने ही गुन्ह्याची उकल केली. सायबर शाखेचे संतोष चव्हाण यांनीही या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…