क्राईम न्यूज

Vasai Crime News : एकाच कुटुंबातील तिघांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला 72 तासांत अटक

Vasai Crime Branch Unit 3 Latest News : गुन्हे शाखा, कक्ष-3 (विरार) चे मोठे यश; कर्जबाजारीपणामुळे चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याचे निष्पन्न धारदार कोयत्याने वृद्ध आई-वडिलांसह मुलीवर केले वार

वसई/विरार :- वसई तालुक्यातील अर्नाळा येथे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांवर झोपेत असताना धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करणाऱ्या अज्ञात आरोपीला गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-3 (विरार) च्या पथकाने केवळ 72 तासांच्या आत अटक केली आहे. हा हल्ला कर्जबाजारीपणामुळे चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.Vasai Latest Crime News

काय आहे नेमकी घटना?

6 ऑक्टोंबर रोजी अर्नाळा, बंदरपाडा येथील रहिवासी नेत्रा जगन्नाथ गोवारी (वय 52) यांच्या राहत्या घरी ही गंभीर घटना घडली. नेत्रा गोवारी, त्यांचे वडील जगन्नाथ गोविंद गोवारी (वय 76 वय) आणि आई लीला जगन्नाथ गोवारी (वय 72 ) हे तिघेही झोपेत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्यावर धारदार कोयत्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

72 तासांत आरोपी जेरबंद

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा, कक्ष-3 च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

या तपासामध्ये हा गुन्हा दिपेश अशोक नाईक (वय 29, रा. चंदरपाडा, अर्नाळा) याने केल्याचे निष्पन्न झाले. 8 ऑक्टोंबरला त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, त्याने कर्जबाजारी झाल्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा जीवघेणा हल्ला केल्याची कबुली दिली. आरोपी दिपेश नाईकला पुढील कारवाईसाठी अर्नाळा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटिकरण) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे आणि त्यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

43 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago