•विरारमधील घरफोडीचा छडा; चोरीचा माल उत्तर प्रदेशात कुरियरने पाठवण्याचा डाव पोलिसांनी उधळला
वसई/विरार :- विरार पूर्व येथील एका मोबाईल शॉपचे शटर तोडून सुमारे 22 लाख रुपयांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात वसई गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाला मोठे यश आले आहे. ऋषीकेश चेलाराम गुप्ता यांच्या चंदनसार रोडवरील दुकानात 16 ते 17 फेब्रुवारी दरम्यान ही मोठी घरफोडी झाली होती. चोरट्याने दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि 21 लाख 86 हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल चोरून नेले होते. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य आणि पद्धत लक्षात घेऊन गुन्हे शाखेने मोबाईल दुकान फोडणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान सहाय्यक फौजदार मनोज मोरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, हा गुन्हा पप्पु ऊर्फ अजमतअली मोहम्मदअली शेख याने केल्याचे निष्पन्न झाले. नालासोपारा येथील धानिवबाग भागात राहणारा हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्याचा रहिवासी आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि त्याची सखोल चौकशी केली.
तपासातून एक धक्कादायक बाब समोर आली की, आरोपीने चोरलेले मोबाईल ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून कुरियरद्वारे थेट उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली होती. पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवून या चोरीच्या मालाचा माग काढला आणि 15 लाख 47 हजार 616 रुपये किमतीचे एकूण 83 मोबाईल फोन जप्त केले. या कारवाईमुळे चोरट्यांनी आंतरराज्य स्तरावर चालवलेली चोरीची मोठी साखळी समोर आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा-2 वसई युनिटचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने या गुन्ह्याची उकल केली आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…