क्राईम न्यूज

Vasai Crime Beanch : लाखोंचा मुद्देमाल हस्तगत – वसई गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

Vasai Crime Branch Arrested Criminal : मोबाईल विश्लेषणातून दोन चोरटे गजाआड, 12 लाखांहून अधिक किंमतीचा 302 कार्टन ब्लेड मिक्स माल जप्त

वसई :- नायगाव पोलीस ठाणे Naygaon Police Station हद्दीत घडलेल्या मोठ्या चोरीप्रकरणी वसई गुन्हे शाखा-२ च्या पथकाने अवघ्या काही दिवसांत दोन आरोपींना जेरबंद करून तब्बल 12 लाख 68 हजार 400 किंमतीचा 302 कार्टन कटर ब्लेड मिक्स माल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. Vasai Latest Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव पटेल (वय 40, व्यवसाय- स्टेशनरी) यांच्या कामण परिसरातील कंपनीतून 11 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी दोन ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी माल लंपास केला होता. घटनेनंतर वसई गुन्हे शाखा-२ चे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाची पाहणी करून साक्षीदारांकडून माहिती घेतली. त्यानंतर मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करताच आरोपींचा थांगपत्ता लागला.

पोलिसांनी यतीन हरीभाई भप्पा (21 वय, रा. कामण, वसई) आणि महादेव गेलाभाई कलानीया (23 वय, रा. तुंगारफाट, वसई) या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्यांना नायगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-2 वसई पथकाचे कौतुकास्पद यश

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. युनिट-2 वसईचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते यांच्यासह गुन्हे शाखा व सायबर शाखेतील पथकाने ही कामगिरी केली.

या कारवाईनंतर वसई-नायगाव परिसरात पोलिसांच्या दक्षतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून व्यापाऱ्यांकडून गुन्हे शाखा-2 वसईच्या पथकाचे कौतुक केले जात आहे.

vivek

Recent Posts