मुंबई

Varsha Gaikwad On Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांचा बार्सिलोना दौरा रद्द… काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची टीका

•बार्सिलोना येण्या जाण्याचा खर्च 70 लाख रुपये, त्यांच्या खर्चावर वर्षा गायकवाड यांचा प्रश्न उपस्थित

मुंबई :- सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार Ashish Shelar यांनी आय. ओ. टी. सोल्युशन वर्ल्ड काँग्रेस ॲंड बार्सिलोना सायबर सिक्युरिटी काँग्रेस 2025 या कार्यक्रमाला सहभागी होणार होते. या दौऱ्यावर तब्बल सत्तर लाख रुपये खर्च करणार असल्याचा आरोप काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. आशिष शेलार यांच्यासह तीन जणांचे शिष्टमंडळ या दौऱ्यावर जाणार असल्याचे प्राथमिक सांगण्यात आले होते. परंतु, युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे हा दौरा रद्द केल्याचे आशिष शेलार यांच्या विभागाकडून जाहीर करण्यात आले होते.

वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी या दौऱ्या संदर्भात त फेसबुक पोस्टवर लिहिताना म्हणाले की,अबब.. बार्सिलोना येण्या-जाण्याचा खर्च 70 लाख…सत्ताधारी पक्षातील आयटी मंत्री आशिष शेलार हे आपल्या दोन अधिकाऱ्यांसह बार्सिलोना शहरात आयोजित Solutions World Congress and Barcelona Cyber Security Congress 2025 या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी गेलेत. परंतु करदात्यांचे तब्बल 70 लाख रुपये खर्चून हा दौरा नियोजित करण्यात आलाय. या दौऱ्यासाठी खरंच एवढा अमाप खर्च येणार आहे का? प्रवासाचा खर्च, राहण्याचा खर्च याचा पटणारा हिशोब सरकारनं सादर करावा.

वर्षा गायकवाड Varsha Gaikwad पुढे म्हणाले की,या दौऱ्यासंदर्भातील माहिती कळताच जनतेला सुद्धा प्रश्न पडलाय की, इकडे जनतेला दिलेले शब्द पाळता येत नाहीत, दिलेल्या योजना सुरळीत राबवता नाहीत.. का तर, राज्याच्या तिजोरीत खणखणाट आहे.. त्यात दौरे करताना का उगीचचा करदात्यांचा अधिकचा पैसा वाया घालवायचा?

असो.. मंत्री महोदय दौऱ्यावरून आल्यानंतर प्रदर्शनाशी संबंधित सविस्तर अहवाल आणि आपल्या राज्याच्या गतिमान विकासाच्या दृष्टीकोनातून काय त्या प्रदर्शनातून घेऊन आलेत, त्याचा फायदा काय? याबाबत ते माहिती देतील, अशी अपेक्षा आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago