मुंबई

Varsha Gaikwad : खासदार वर्षा गायकवाडांचा घणाघात – ‘भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा, नाहीतर नागरिकांचा जीव धोक्यात!’

•बीकेसी मेट्रो स्थानकात छत गळल्याने प्रवाशांचा संताप; एमएमआरसीच्या दर्जाहीन कामावर प्रश्नचिन्ह

मुंबई | मुंबईतील बहुप्रतिक्षित ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’ मार्गिकेवरील गळतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी शिरल्यामुळे आधीच टीकेचा धनी बनलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ला आता बीकेसी मेट्रो स्थानकातील गळतीने पुन्हा अडचणीत आणले आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांनी स्वतः सोशल मीडियावर या गळतीचा व्हिडिओ पोस्ट करत एमएमआरसीच्या कामावर जोरदार टीका केली आहे. “हे केवळ गळती नाही, तर भ्रष्टाचाराचे पाझर आहेत,” असा घणाघात करत त्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली आहे.

त्यांचा आरोप आहे की, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच छतांमधून पाणी गळू लागल्यास प्रत्यक्ष पावसात काय हाल होतील? नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सरकार किती गंभीर आहे, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.

दरम्यान, MMRC कडून तातडीने गळतीग्रस्त परिसर बंद करण्यात आला असून, दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अशा घटना वारंवार घडत असल्याने मेट्रो प्रकल्पाच्या संपूर्ण दर्जावरच नागरिकांत आणि नेत्यांत प्रचंड नाराजी आहे.

vivek

Recent Posts