क्राईम न्यूज

Vanraj Andekar : पुण्यात टोळीयुद्धाचा कट उधळला, वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला

Vanraj Andekar : सोमनाथ गायकवाडच्या मुलावर हल्ला करण्याची तयारी; समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे :- माजी नगरसेवक वनराज आंदेकर Vanraj Andekar यांच्या हत्येचा वर्षश्राद्ध होताच, पुण्यातील टोळीयुद्ध पुन्हा पेटण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत हा मोठा कट उधळून लावला आहे. वनराज आंदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता, परंतु पोलिसांनी वेळीच एका आरोपीला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोळीयुद्धाचा इतिहास

पुण्यातील कुख्यात बंडू आंदेकर गट आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील जुने वैर पुन्हा एकदा समोर आले आहे. 2023 मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते आणि निखिल आखाडेवर हल्ला केला होता, ज्यात निखिलचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून गायकवाड टोळी बदला घेण्यासाठी टपून होती. यातूनच 1 सप्टेंबर 2023l4 रोजी बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकरची डोके तालीम भागात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

वनराजच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असताना, सोमनाथ गायकवाड तुरुंगात असूनही त्यांच्या मुलावर हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती. या प्रकरणात २३ जणांना अटक झाली आहे आणि त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे.

हल्ल्याचा कट कसा उधळला?

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा आंदेकर याने एकाला खोलीसाठी पाच हजार रुपये देऊन कात्रज परिसरात सोमनाथ गायकवाडच्या मुलाच्या घरावर पाळत ठेवण्यास सांगितले होते. 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता आरोपीने वनराजच्या खुन्यांची घरे पाहिली आणि त्याबद्दलची माहिती व्हॉट्सअॅपवर कृष्णाला दिली. त्यानंतर कृष्णाने हल्ल्यासाठी 5 शस्त्रे (वेपन) घेऊन 7 ते 8 जणांना पाठवले होते.

मात्र, पोलिसांनी वेळीच हालचाल करत यातील एका आरोपीला ताब्यात घेतले आणि हा हल्ला होण्यापूर्वीच त्याचा कट उधळला. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडे या गुन्ह्याचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुणे शहरात पुन्हा एकदा होणारे टोळीयुद्ध तात्पुरते तरी टळले आहे.

vivek

Recent Posts