क्राईम न्यूजपुणे
Trending

Vaishnavi Hagwane Case : वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सासरा व दीर अखेर अटकेत

Vaishnavi Hagwane Case : सात दिवसांपासून फरार आरोपी तळेगावमध्ये हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्हीत आढळले,सासरकडून मानसिक व शारीरिक छळाच्या आरोपांनंतर आत्महत्येचा संशय हत्या?

पुणे :- हुंडाबळीच्या सावटाखाली आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आलेल्या वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) यांच्या मृत्यूनंतर फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे अखेर तळेगावमध्ये पोलिसांच्या जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे, हे दोघे हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेत असतानाच त्यांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.

वैष्णवीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिच्या पतीसह सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपांखाली असलेले सासरे आणि दीर यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान, वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात ‘गळा आवळल्याने मृत्यू’ झाल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्या मृत्यूला आत्महत्या म्हणावे की हत्या, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

राजेंद्र आणि सुशील हे दोघेही तळेगावातच लपून-छपून वावरत होते. त्यांचे हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांना त्यांच्या थेट ठिकाणाचा माग मिळाला. त्याच क्षणी अटक केली गेली. मात्र यामुळे पोलिसांच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे — इतक्या दिवस आरोपी मुक्तपणे फिरत असताना पोलिस नक्की काय करत होते?

या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी सोशल मीडियावरून तसेच सामाजिक संघटनांतून होत आहे. एक सुशिक्षित, तरुण विवाहित महिला सासरच्या छळाला कंटाळून प्राण गमावते आणि आरोपी मात्र मोकळे फिरतात, ही समाजव्यवस्थेची शोकांतिका आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0