क्राईम न्यूज

Vaishnavi Hagawane case news : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर पदावरून हटवले

Vaishnavi Hagawane case news. पीडितेच्या वडिलांनी सुपेकर यांचे नाव घेतल्यानंतर प्रशासनात खळबळ

पुणे :- पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील प्रशासनात खळबळ उडाली असून या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर गृह विभागाने मोठी कारवाई केली आहे. Vaishnavi Hagawane case news. विशेष IG (कारागृह) जालिंदर सुपेकर यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्याकडे असलेला नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विभागांचा DIG (कारागृह) म्हणूनचा अतिरिक्त प्रभार देखील काढून घेण्यात आला आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी थेट सुपेकर यांचे नाव घेतल्यामुळे प्रकरण अधिकच गाजू लागले. राजेंद्र हगवणे हे वैष्णवीचे वडील असून, सुपेकर त्यांचे साले आहेत. आरोप करण्यात आला की, सुपेकर पोलीस यंत्रणेवर दबाव टाकत आहेत आणि त्यामुळे राजेंद्र हगवणे यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाहीये.

गृह विभागाची मोठी कारवाई, तीन विभागांचे अतिरिक्त प्रभार काढून घेण्यात आले

या आरोपांनंतर जालिंदर सुपेकर यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं की, त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. “हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीसोबत जे काही केलं, ते पूर्णपणे चूक होतं. मी हे पहिल्या दिवसापासूनच सांगत आलो आहे,” असं सुपेकर यांनी म्हटलं.

दरम्यान, गृह विभागाने नव्या जबाबदाऱ्या जाहीर केल्या आहेत. नागपूर विभागाचा कारागृह DIG म्हणूनचा अतिरिक्त प्रभार स्वाती साठे (DIG, पश्चिम विभाग, पुणे) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. नाशिक सेंट्रल जेलच्या अधीक्षिका अरुणा मुगुटराव यांना नाशिक विभागाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. नागपूर सेंट्रल जेलचे अधीक्षक वैभव आगे यांना छत्रपती संभाजीनगर विभागाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts