पुणे
Trending

Uruli railway station : लोकशाहीच्या उत्सवात महिलांची नैसर्गिक विधींसाठी कोंडी ? उरुळी कांचन रेल्वे स्टेशनवर टाॅयलेट असताना ते बंद का ? आदर्श रेल्वे स्थानकाच्या शौचालयाची दुरवस्था

Uruli railway station Toilet Closed : हा तर महिलांचा अपमान ! प्रवास करणाऱ्या महिलांची होतेय कुचंबणा

[ दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी ]
Uruli Kanchan Railway Station : दौंड, ता. १३ देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या देशात निवडणुकांचा (Lok Sabha Elections ) संग्राम रंगला आहे. पण याच लोकशाहीच्या देशात महिलांची नैसर्गिक विधींसाठी कोंडी केली जातेय. लोकशाहीच्या देशात महिलांना शौचालयच (ladies Washroom) नाहीत हि मोठी शोकांतिका आहे. महिला प्रवाशांना शरीरधर्म उघड्यावर उरकता येत नाही. लोकलज्जा, संकोच, टोचणाऱ्या नजरा अशा कितीतरी गोष्टी आड येतात. त्यातूनही आड येते रेल्वे प्रशासनाची असंवेदनशील वृत्ती. पण सुस्त रेल्वे प्रशासन या अनास्थेकडे फार गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे लोकशाहीचा निवडणूक उत्सव होत असताना महिलांना त्यांच्या नैसर्गिक विधीचीही सोय मिळू नये, ही किती मोठी शोकांतिका म्हणावी लागेल ?
आदर्श रेल्वे स्थानकाचा बहुमान मिळून प्रवाशांकरिता स्थानकातील मूलभूत सोयीसुविधांसाठी रेल्वे प्रशासनाकडून निधी उपलब्ध करून उरुळी कांचन रेल्वे स्थानकाची सुधारणा करण्यात आली होती. माञ आज याच स्थानकातील शौचालायची नियमित साफसफाई न केल्याने प्रवाशांना घाणीला सामोरे जावे लागत आहे. महिला व नागरिक रेल्वे स्टेशनवर असलेले टाॅयलेट जास्त प्रमाणात वापर करतात म्हणून हे टाॅयलेट नेहमी कुलूप लावून बंद ठेवतात, मग प्रवाशांना प्रश्न पडतो की हे टाॅयलेट नक्की कोणासाठी ? Uruli railway station Toilet News

पुणे शहराचा उपनगरीय भाग म्हणून उरुळी कांचन परिसर झपाट्याने विकसित होत आहे. तसेच पूर्व हवेली, दौंड व पुरंदर या तालुक्यांतील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून या भागात शहरीकरण व औद्योगिकीकरण झपाट्याने विकसित होत असल्याने दळणवळणाची सुविधा निर्माण करणे क्रमप्राप्त झाले आहे. सकाळच्या वेळी पुणे, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या व सायंकाळी तेथून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये दैनंदिन प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या स्थानकातील दरडोई उत्पन्नातून रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत मोठा महसूल जमा होत असतो. माञ असे असतानाही या स्थानकातील प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून शौचालयाची साफसफाई न केल्यामुळे दररोज नरकयातना भोगाव्या लागत आहेत. शौचालयाची नियमित साफसफाई न केल्याने सर्वञ दुर्गंधी पसरली आहे. प्रवाशांना नाक मुठीत घेऊन त्याचा वापर करावा लागतो. अशातच महिला प्रवाशांची माञ भयंकर कुचंबणा होत असतानाही रेल्वे प्रशासन स्वच्छेतेच्या दृष्टीने कमकुवत पडत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. Uruli railway station Toilet News

रेल्वे कर्मचारी वसाहती शेजारी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्या, तसेच शिळ्या व कुजलेल्या अन्नाचीही दुर्गंधी पसरलेली आहे. तसेच काही बेशिस्त प्रवाशांनी गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसते. उरुळी कांचन रेल्वे स्टेशनवर सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.Uruli railway station Toilet News

या प्रकरणी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन या समस्या सोडवाव्यात अन्यथा लवकरच रहिवाशांचा मोर्चा आणू
—उमेश म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0