Uran News : कामगार नेते स्व. शाम म्हात्रे यांची पुण्यतिथि दिमाखात साजरी.
उरण : दिवंगत जेष्ठ नेते शाम पदाजी म्हात्रे यांचे सहावे पुण्यस्मरण ९ जून २०२४ रोजी खांदा कॉलनी येथील त्यांच्या निवास्थानी त्यांच्या कन्या कामगार नेत्या कु . श्रुती शाम म्हात्रे यांनी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. स्व.शाम म्हात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी आगरी शिक्षण संस्था शाळेत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास कामगार नेत्या कू.श्रुती शाम म्हात्रे यांच्या हस्ते स्व. शाम म्हात्रे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्हार अर्पण करण्यात आला.त्यावेळी आगरी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक पंकज भगत तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी अभिवादनाच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावत स्व.शाम म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
स्व.शाम म्हात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकितून त्यांची कन्या श्रुती म्हात्रे दरवर्षी विविध उपक्रम राबवित असतात ह्या वर्षी त्यांनी स्वामी समर्थ फाउंडेशन या संस्थेला सामाजिक बांधिलकी जाणिवेतून सढळ हस्ते रोख निधी स्वरूपात भेट देऊन आपल्या वडिलांच्या आठवणींना तेवत ठेवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे .त्यानंतर संध्याकाळी गणेश मंदीर तसेच व्यावसायीक विक्रेता संघ येथिल व्यापारी वर्गाने देखील अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.संध्याकाळी गणेश मंदिरात श्रुती म्हात्रे ह्यांच्या हस्ते गणेशाची आरती करून त्यानंतर पुण्यतिथी साजरी करण्यात आली
दिवंगत जेष्ठ नेते शाम म्हात्रे साहेब यांच्या पुणयतिथीनिमित्त विविध पक्षातील नेतेमंडळी , कार्यकर्ते, कोकण श्रमिक संघातील सर्व कामगार वर्ग तसेच रोज बाजारातील व्यापारी वर्ग आणि आगरी शिक्षण संस्थेतील समस्त परिवार हे या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिले होते.