Umesh Patil : मी कधी अजित दादांना सोडले नव्हते…. फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती ; उमेश पाटील
![](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-05-at-11.58.23-AM-780x470.jpeg)
Umesh Patil Joined Ajit Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिला होता राजीनामा, अजित पवारांच्या हस्ते पुनरागमन
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटात अजित पवार यांच्या हस्ते प्रवेश केला आहे. Umesh Patil Joined Ajit Pawar Group विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेश पाटील यांनी पक्षाचा मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता. मोहोळ विधानसभा निवडणुकी मधून पक्षातून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले उमेश पाटील यांनी पक्ष त्याग केला होता. परंतु ते इतर कोणत्याही पक्षात गेले नव्हते. त्यानंतर ते अनेक वेळा विधानसभा प्रचारादरम्यान इतर पक्षातील खास करून मोहोळ विधानसभा उमेदवार यांच्या विरोधात शंडठोकून होते. राज्यात महायुतीचे म्हणजेच भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची सत्ता स्थापन झाली आहे. देवगिरी या शासकीय निवासस्थानी अजितदादा यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
![](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-05-at-11.58.23-AM-1-1024x799.jpeg)
![](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-05-at-11.58.23-AM-1024x803.jpeg)
उमेश पाटील काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकी पुर्वी मी माझ्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता.परंतु इतर कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता.सोलापुर जिल्ह्यातील “मोहोळ विधानसभा” या राखीव मतदारसंघा मधील मातब्बर प्रस्थापित नेत्या सोबत टोकाचे मतभेद झाल्यामुळे मी नाईलाजाने पक्ष त्याग केला होता.मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता अजितदादांच्या नव्हे तर तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात होती हे निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता होती.त्यामुळे मी व माझ्या सर्वपक्षीय सहका-यांनी मिळुन 15 दिवसात स्वतःचा उमेदवार देऊन (राजू खरे) विधानसभेला 30 हजार मताधिक्याने निवडून आणला.अजित दादांनी उमद्या मनाने स्वत:च्या पक्षाचा आमदार पडला तरी माझ्या जिगरबाज लढाऊ बाण्याचे कौतुक केले.मी दादांना कधी सोडले नव्हते.फक्त एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता इरेला पेटला तर अपराजित मातब्बर नेत्याला देखिल पराभूत करू शकतो हे सिद्ध करायचे होते.माझा देवगिरी येथे सर्व मंत्री,आमदार व पार्थ दादा पवार यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या हस्ते झालेला पुन्हा पक्ष प्रवेश ही तांत्रिक बाब आहे.मी कधीही अजितदादांना सोडले नव्हते…फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती..इतकच